ETV Bharat / state

राजू शेट्टी यांच्यातील शेतकरी मेला- प्रवीण दरेकर - Praveen Darekar news

राजू शेट्टी यांच्यामधील शेतकरी मेला असल्याची टीका विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. पंढरपूर तालुक्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी प्रविण दरेकर आले होते.

Praveen Darekar and Raju Shetty
प्रवीण दरेकर आणि राजू शेट्टी
author img

By

Published : Oct 20, 2020, 10:48 AM IST

पंढरपूर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आवाज उठवत होते. परंतु सध्या त्यांना सत्ताधारी पक्षाकडून विधान परिषद मिळणार आहे. त्यामुळे ते आंदोलन करताना दिसत नाहीत. राजू शेट्टी यांच्यामधील शेतकरी मेला असल्याची टीका विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. पंढरपूर तालुक्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आले होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार प्रशांत परिचारक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख उपस्थित होते.

Opposition leader Praveen Darekar inspecting the damaged area
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर नुकसान झालेल्या भागाची पाहणी करतांना

दरेकर म्हणाले, या तीन डगरीवरच्या सरकारला शेतकर्‍यांचे काही देणे घेणे नाही. त्यामुळेच अजून अतिवृष्टी होणार असल्याचे शेतकर्‍यांना सांगत आहेत. त्यानंतर होणार्‍या पिकांचे, घरांच्या नुकसानीचे पंचनामे करु, असे म्हणत आहेत. असे म्हणणे म्हणजे वेळकाढू पणा असून शेतकर्‍यांची क्रूर थट्टा लावली आहे. शेतकर्‍यांना काही मदत करायची भावना असेल तर केंद्राकडे बोट न दाखवता राज्याने कर्ज काढावे. अद्यापही 60 ते 70 हजार कोटी कर्जे काढता येते.

मात्र या सरकारची शेतकर्‍यांना मदत द्यायची दानत नाही. त्यामुळेच केंद्राकडून जीएसटीचे पैसे मिळाले तरच मदत करता येईल अशी भूमिका हे सरकार घेत आहे. उध्दव ठाकरे यांनी मागील वर्षी शेतकर्‍यांना 25 ते 50 हजार एकरी मदत देण्याची मागणी केली होती. आता तेच मुख्यमंत्री आहेत. मग आता शेतकर्‍यांना 25 व 50 हजार मदत द्यायला का वेळ लागत आहे. जे बोलता ते करा, असा टोला दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

सद्याच्या घडीला शेतकर्‍यांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. सत्ताधार्‍यांनी विरोधाकांवर टिका करण्याची वेळ नाही. त्यामुळे या सरकारने तात्काळ शेतकर्‍यांना तातडीने 15 हजार रुपये मदत करावी व नंतर पंचनामे करत बसावे, असे दरेकर यांनी सांगीतले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.