पंढरपूर - संपूर्ण राज्यामध्ये पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यात आली पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पोलिओचा लस देताना एक वर्षाच्या बाळाच्या पोटात सूक्ष्म प्लॅस्टिकचा तुकडा गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिओ लसीकरण मोहिमेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. याबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
रविवारी संपूर्ण जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहीम आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत होती. जिल्ह्यातील आरोग्य प्राथमिक केंद्रासह अंगणवाडीमध्ये लसीकरण करण्यात आले. भाळवणी येथील बाबा व माधुरी बुरांडे आपल्या एका वर्षाच्या बाळाला घेऊन पोलिओचा लस देण्यासाठी भाळवणी प्राथमिक केंद्रावर आले होते. लस देण्याची मोहीम सुरू असताना महिला कर्मचारी लस लांबूनच बाळांच्या तोंडात टाकत होते. त्यातूनच बुरांडे यांच्या लहान बाळाला तोंडात टाकत असताना, प्लास्टिकला सूक्ष्म तुकडा वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाच्या तोंडात गेला. बुरांडे पती-पत्नी एक वर्षाच्या लहान मुलाला घरी घेऊन गेले असता. घरी गेल्यानंतर बाळाला त्रास होऊ लागला.
बुराडे कुटुंबीयांनी सामाजिक कार्यकर्त्या ताडे यांच्याशी संपर्क करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. बाळाला तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना कडे घेऊन गेले असता. बाळावर उपचार सुरू केले. शिवाय स्कॅनिंग करण्यात आली. मात्र, कॅनिंग मध्ये कोणत्याही प्रकारचा तुकडा आढळला नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी ए. डी. रेपाळ यांनी दिली. बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवस बाळाला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
या प्रकारामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे लसीकरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही या निमित्ताने समोर आला आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या राजेश्री ताड यांनी जिल्हा प्रशसानाकडे केली आहे.