सोलापूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. सोलापुरातील महसुल भवनच्या उद्घाटनसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप आमदार व खासदार डॉ जय सिद्धेश्ववर महाराज हे सोलापूर येथे आले आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महसूल खात्यातील सर्व वरीष्ठ अधिकारी या उदघाटन कार्यक्रमात उपस्थित होते.
कत्तलखाना बंद करण्यासाठी निवेदन: देवेंद्र फडणवीस हे महसुल भवनच्या उद्घाटनसाठी येणार असल्याने निवेदन देण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते आले होते. सोलापुरातील मानद पशुकल्याण मध्ये सामाजिक कार्य करणारे विलास शिवलाल शहा हे निवेदन देण्यासाठी आले होते. सोलापूर हैदराबाद महामार्गावर असलेल्या सोनांकुर कत्तलखाना बंद करण्यासाठी अनेक वर्षांपासून विलास शहा हे झटत आहेत. विलास शहा निवेदन देण्यासाठी आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन देताना अचानक त्यांना भोवळ आली व शहा खाली पडले. यावेळी ताबडतोब फडणवीसांनी त्यांना धरले आणि खुर्चीवर बसवून त्यांना पाणी पाजले.
भोवळ आलेल्या वृद्धा फडणवीसांनी सावरले : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना विलास शहा यांना भोवळ आल्याने, एकच गोंधळ उडाला होता. देवेंद्र फडणवीस यासोबतच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, बबनदादा शिंदे, तसेच भाजपचे अधिकारी व पदाधिकाऱ्याची मोठी गर्दी होती. या गर्दीत फडणवीस यांनी विलास शहा यांना स्वतः उचलले आणि खुर्चीवर बसवून पाणी पाजले. त्याचबरोबर निवेदन स्वीकारून पुढे गेले. पोलिसांनी देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने परिस्थिती ताबडतोब नियंत्रित आली.
आत्मदहनाचा दिली इशारा: विलास शहा यांनी कत्तलखाना बंद करावे अन्यथा आत्मदहन करणार असल्याचे इशारा दिला. विलास शहा हे माध्यमांना माहिती देताना इशारा दिला, सोलापूर हैदराबाद महामार्गावर असलेल्या सोनांकुर कत्तलखाना बंद करावे, या कत्तलखान्यामुळे बोरामणी विमानतळाचा विकास होत नाही. तसेच अनेक बांगलादेशी या कत्तलखान्यात काम करत आहेत, हे घुसखोर आहेत असा आरोप, विलास शहा यांनी केला आहे. येत्या 15 तारखेपर्यंत हा कत्तलखाना बंद नाही झाला तर, आत्मदहन करणार असा इशारा विलास शहा यांनी दिला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. सोलापूर हैदराबाद महामार्गावर असलेल्या कत्तलखाना बंद करावे अन्यथा आत्मदहन करणार - विलास शहा सामाजिक कार्यकर्ते
हेही वाचा -