पंढरपूर - तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरीकांनी स्वत: संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुढाकार घेवून, जबाबदारीचे वर्तन करुन कोरोना संसर्गाची लागण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. आजाराचा प्रतिबंध उपचारापेक्षा सर्वोत्तम उपाय असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
नागरिकांनो कोरोनाबाबत सूचनेचे पालन करा..
तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. उपचारासाठी रुग्णांलयातही दाखल रुग्णांची संख्या जास्त असल्याने त्यांना वेळेवर बेड, ऑक्सिजन, व्हेटींलेटर यासाठी रुग्णांला व त्यांच्या नातेवाईकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व गोष्टी टाळावयाच्या असतील तर नागरिकांनी यावर प्रतिबंधात्म उपाचार करणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर, योग्य आहार व व्यायाम या पंचसुत्रीचा वापर करावा. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या कोणत्याही व्यक्तीकडून लक्षणे दिसण्यापूर्वी दुसऱ्यालाही संसर्ग होण्याची शक्यता आहे. अशा व्यक्तीमध्ये कोणतेही लक्षणे दिसत नाहीत. यासाठी सतत मास्कचा वापर करावा, असे ढोले यांनी सांगितले.
नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे..
तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. यासाठी लग्न सोहळे, मुंज, अंत्यविधी, पिंडदान, सामुहिक प्रार्थना,सभा तसेच जत्रा, भंडारा यासारखे धार्मिक कार्यक्रमास जाणे टाळावे. शेतीमध्ये सध्या खरीप हंगामाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने शेतकऱ्यांनी खते, बियाणे आदी खरेदीसाठी योग्यती काळजी घ्यावी. नागरिकांना आजारा कोणतेही लक्षणे जाणवली की तात्काळ डॉक्टराचा सल्ला घ्यावा, कोणीही आजार अंगावर काढू नये तसेच कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे, आवाहनही ढोले यांनी यावेळी केले.