ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला पावसाची आस - सोलापूर जिल्ह्यातील

राज्यातील अनेक नद्यांनी रौद्ररूप धारण केलेले आहे. असे असताना मात्र सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला अजूनही पावसाची आस आहे. जुलै महिना उलटूनही कोरडी असलेल्या सीना नदी खोऱ्यात दमदार पावसाची आवश्यकता आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला पावसाची आस
author img

By

Published : Aug 1, 2019, 11:36 PM IST

सोलापूर - राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून रौद्ररूप धारण केलेले आहे. असे असताना एकीकडे मात्र जुलै महिना उलटूनही सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी अजूनही कोरडीच आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रमुख जलस्त्रोत असलेल्या सीना नदी खोऱ्यात दमदार पावसाची आवश्यकता आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला पावसाची आस

पावसाळ्याचे जून आणि जुलै हे दोन महिने गेले मात्र पाऊसच न झाल्यामुळे संपूर्ण नदीपात्र आजही कोरडेच आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कामांसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या पाण्याची वर्षभर निकड भासत असते. यामुळे शेतकऱ्यांनी दमदार पाऊस व्हावा, पाण्याची पातळी वाढावी म्हणून वरुणराजाकडे साकडे घालण्यात घातले आहे.

no water in seena river in solapur

गेल्या दोन-तीन वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातही हवा तितका पाऊस झालेला नाही. सीना नदी ही कोरडी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केल्याने त्या पेरणीला पावसाची अत्यंत गरज आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून बंकलगी बंधारा वाहून गेल्यामुळे संजवाड, औराद, बोळकवठा, राजूर ह्यासह अन्य गावांतील शेतकरी हे पावसाची वाट पाहत आहेत.

दोन ते तीन वर्षापासून या भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने येथील शेतकऱ्यांसाठी गंभीर समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत यावर्षीही पाऊस नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे

Intro:राज्यातील अनेक नद्यांनी रौद्ररूप धारण केलेले असतांना सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी कोरडी ठाक,
सीना खोऱ्यात दमदार पावसाची आवश्यकता
सोलापूर-
राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून रौद्ररूप धारण केलेले असतांना सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी मात्र अजूनही कोरडीच आहे. पावसाळ्याचे जून आणि जुलै हे दोन महिने गेल्या वर देखील पाऊसच न झाल्यामुळे पूर्ण नदी आजही कोरडीच आहे. Body:चालू वर्षातील निम्मा पावसाळा संपला तरीही सीना नदी परिसरात एकही पाऊस पडला नाही. शेतकऱ्यांना आणखी दमदार पावसाची गरज असून पाण्याची पातळी वाढण्यासाठी मोठ्या पावसासाठी वरूणराजाकडे साकडे घालण्यात येत आहे.
गेल्या दोन-तीन वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातही तसा पाऊस नाही झाल्याने सीना नदी ही कोरडी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केल्याने त्या पेरणीला पावसाची अत्यंत गरज आहे. पाऊस काय व्हायचा तसा झाला नाही या भागातील शेतकऱ्यांची पावसामुळे चिंता निर्माण झाली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून बंदलगी बंधारा वाहून गेल्यामुळे संजवाड, औराद, बोळकवठा, राजुर ह्यासह अन्य गावांतील शेतकरी हे पावसाची वाट पाहत आहेत.
दोन ते तीन वर्षापासून या भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने येथील शेतकऱ्याचे समस्या गंभीर निर्माण होत चाललेला आहे. अशा परिस्थिती मध्ये यावर्षी देखील पाऊस नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.