ETV Bharat / state

शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्त्यांचे उपोषण

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करत सोलापुरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे.

शरद पवार
author img

By

Published : Mar 13, 2019, 12:45 PM IST

सोलापूर - माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करत सोलापुरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. सात रस्ता येथील यशवंतराव चव्हाण पुतळ्याच्या पायथ्याशी बसून विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

कार्यकर्त्यांचे उपोषण

सामान्य कार्यकर्त्यांच्या हितासाठी का होईना पवारांनी माढ्यातून ही निवडणूक लढवावी, अशी मागणी होत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातल्या राष्ट्रवादीतील अंतर्गत कुरघोड्या रोखण्यासाठी खुद्द शरद पवार यांनी माढा लोकसभा लढण्याचे सूतोवाच केले होते. माढ्याच्या मेळाव्यात बोलताना तुम्ही सगळे आग्रह करताय तर मी नाही म्हणणार आहे का? असे वक्तव्य करत त्यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे सर्व गट-तट कामाला लागले असतानाच मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवारच्या उमेदवारीमुळे शरद पवार यांची कौटुंबिक आणि राजकीय कोंडी झाली.

'माढा अन शरद पवारांना पाडा' असे समाज माध्यमांवर ट्रोल झाल्यानंतर त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. याचा क्लेश व्यक्त करण्यासाठी सोलापुरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुहास यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले. त्याला वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचाही प्रतिसाद मिळत आहे.

राज्यात आणि माढा लोकसभा मतदारसंघातही बदलत्या राजकीय परिस्थितीचा अंदाज आलेल्या पवारांनी मावळच्या उमेदवारी वरून स्वतः निवडणूक लढण्यापासून दूर ठेवत नवा हातखंडा अवलंबला आहे. पण कार्यकर्त्यांची ईच्छा त्यांना परावृत्त करणार का? हा खरा सवाल आहे.

Intro:सोलापूर : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी करत सोलापुरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज उपोषण सुरु केलं आहे.
सात रस्ता येथील यशवंतराव चव्हाण पुतळ्याच्या पायथ्याशी बसून विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे.सामान्य कार्यकर्त्यांच्या हितासाठी का होईना पवारांनी माढ्यातून ही निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे, तिला या आंदोलनाच्या निमित्ताने तोंड फुटले आहे.

Body:माढा लोकसभा मतदारसंघातल्या राष्ट्रवादी अंतर्गत कुरघोड्या रोखण्यासाठी खुद्द शरद पवार यांनीची माढा लोकसभा लढण्याचं सूतोवाच केलं. माढ्याच्या मेळाव्यात बोलताना तुम्ही सगळे आग्रह करताय तर मी नाही म्हणणार आहे का ? असं वक्त्यव करत त्यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले.त्यामुळं सर्व गट-तट कामाला लागले असतानाचं मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवारच्या उमेदवारीमुळं शरद पवार यांची कौटुंबिक आणि राजकीय कोंडी झाली.शिवाय माढ्यात 'माढा अन शरद पवारांना पाडा' ही सोशल मीडियात ट्रोल झाल्यानंतर त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला त्यामुळं राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. म्हणून क्लेश व्यक्त करण्यासाठी सोलापूरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुहास यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरु करण्यात आलं.त्याला वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचाही प्रतिसाद मिळतो आहे.

Conclusion:राजकारणात अनेक अनिश्चितेचे खेळ खेळणाऱ्या शरद पवारांना घराणेशाहीच्या आरोपांची भीती वाटते शिवाय त्यांनी या आधीच आपण निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं होतं पण देशांत, राज्यात आणि माढा लोकसभा मतदारसंघातही बदलत्या राजकीय परिस्थितीचा अचूक आलेल्या पवारांनी मावळच्या उमेदवारी वरून स्वतः निवडणूक लढण्यापासून दूर ठेवत नवा हातखंडा अवलंबला आहे.पण कार्यकर्त्यांची भाबडी माया त्यांना परावृत्त करणार का हा खरा सवाल आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.