ETV Bharat / state

कर्नाटकी बेंदूर सणावरही मोदींची छाप; खिलार बैलाच्या अंगावर रेखाटले नरेंद्र मोदींचे चित्र - kamal

बसवराज देखाणे यांनी आज कर्नाटकी बेंदूर सणाला आपल्या बैलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, कमळ आणि भाजपचे स्थानिक संभाव्य उमेदवार सचिनदादा कल्याणशेट्टी यांचे चित्रं रंगवले आहे.

author img

By

Published : Jun 17, 2019, 11:51 PM IST

Updated : Jun 17, 2019, 11:56 PM IST

सोलापूर- आपल्या आवडत्या नेत्यावरील प्रेमापोटी कोण काय करील याचा काही नेम नाही. मागील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या अनेक समर्थकांनी त्यांची प्रतिमा कपड्यांवर, शरीरावर चितारलेली होती. तर काहींनी आपल्या केशभूषेतूनही मोदीप्रेम व्यक्त केले होते. पण आता एका शेतकऱ्याने कर्नाटकी बेंदूर अर्थात कारहुनवी (बैलपोळा) सणाला चक्क थरथरत्या कातडीच्या बैलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखणे चित्र चितारले आहे.

महाराष्ट्रात बैलपोळा श्रावणात साजरा केला जातो. मात्र, कर्नाटक सीमेलगतच्या गावांमध्ये कर्नाटकी बेंदूर म्हणजे कारहूनवी साजरी केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बासलेगावचे शेतकरी बसवराज देखाणे यांनी ही अफलातून शक्कल लढवली आहे. बसवराज हे स्थानिक भाजप शाखेचे अध्यक्ष असून ते भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.

पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी योजना आखल्याने आज बसवराज यांनी आज या सणाला आपल्या बैलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, कमळ आणि भाजपचे स्थानिक संभाव्य उमेदवार सचिनदादा कल्याणशेट्टी यांचे चित्र रंगवल आहे. त्यामुळे आज करहूनवी निमित्त देखाणे यांच्या बैलांची मिरवणूक गावकऱ्यांसाठी देखणी आणि चर्चेचा विषय ठरली.

बसवराज देखाणे यांच्याकडे खिलार जातीची बैलजोडी आहे. या जातीच्या जनावराच्या कातडीला स्पर्श केल्यावर ती कंपन पावते. असे वैशिष्ट्ये असणारा खिलार हा जगातला एकमेव पाळीवप्राणी आहे. प्रसिद्ध दिवंगत चित्रकार एम.एफ. हुसेन यांनी अशा चित्रकलेचा लाईव्ह डेमो दिला होता. त्यामुळे ते प्रसिद्धी झोतात आले होते. अशा जातीवंत थरथरत्या कातडीच्या बैलांना बैलपोळ्याला रंगविताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. पण बसवराज यांनी आपल्या नेत्यांवरील निष्ठेसाठी ही अशक्य कलाकृती शक्य करून दाखवली आहे.

Intro:सोलापूर : आपल्या आवडत्या नेत्यावरील प्रेमापोटी कोण काय करील याचा कांही नेम नाही तेच खरं. कारण गत लोकसभा निवडणुकीत आपण अनेक मोदी भक्तांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा कपड्यांवर,शरीरावर चितारलेली,कोंदलेली पहिली तर कांहीनी आपल्या हेअरस्टाईलद्वारेही मोदीप्रेम व्यक्त केलं.पण आता थेट एका शेतकऱ्यांनं कर्नाटकी बेंदूर अर्थात कारहुनवी (बैलपोळा) सणाला चक्क थरथरत्या कातडीच्या बैलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखणं चित्र चितारलंय...
Body:महाराष्ट्रात बैलपोळा श्रावणात साजरा केला जातो मात्र याच महाराष्ट्राच्या कर्नाटक सीमेलगतच्या गावांमध्ये कर्नाटकी बेंदूर म्हणजे कारहूनवी साजरी केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातील बासलेगांवचे शेतकरी बसवराज देखाणे यांनी ही अफलातून शक्कल लढवलीय.बसवराज हे स्थानिक भाजप शाखेचे अध्यक्ष आहेत आणि ते भाजपचे निष्ठवंत कार्यकर्ते आहेत.त्यामुळं नमो प्रतिमा, भाजपचा झेंडा, चिन्ह कमळ त्यांच्या लाईफस्टाईलचे भाग बनले आहेत. त्यातच पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी योजना आखल्याने आज बसवराज यांनी आज कृषक सणाला आपल्या बैलावर खुदद पंतप्रधान नरेंद्र मोदी, कमळ आणि भाजपचे स्थानिक संभाव्य उमेदवार सचिनदादा कल्याणशेट्टी यांचं चित्रं रंगवलंय. त्यामुळं आज करहूनवी निमित्त देखाणे यांनी आपल्या बैलांची मिरवणूक गावकऱ्यांसाठी देखणी आणि चर्चेचा विषय ठरलीय.Conclusion:
खरं तर बसवराज देखाणे यांच्याकडे खिलार जातीची बैलजोडी आहे. या जातीच्या जनावराच्या कातडीला स्पर्श केल्यावर ती कंपन पावते. असं वैशिष्ट्ये असणारा खिलार हा जगातला एकमेव पाळीवप्राणी आहे. प्रसिद्ध दिवंगत चित्रकार एम.एफ.हुसेन यांनी अशा चित्रकलेचा लाईव्ह डेमो दिला होता.त्यामुळं ते प्रसिद्धी झोतात आले होते.अशा जातिवंत थरथरत्या कातडीच्या बैलांना बैलपोळ्याला रंगविताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते.पण बसवराज यांनी आपल्या नेत्यांवरील निष्ठतेचं प्रतीक म्हणूनचं काय पण ही अशक्य कलाकृती शक्य करून दाखवली आहे.
Last Updated : Jun 17, 2019, 11:56 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.