ETV Bharat / state

सोलापुरात जातीय सलोख्याची अनोखी परंपरा, माढेकरांनी एकत्र साजरा केला गणेशोत्सवसह मोहरम - जातीय

माढ्यातील  कसबा पेठेतील जगदंबा  मंडळ, शुक्रवार पेठेतील अजिंक्यतारा गणेश मंडळ, सुवर्णयोगी नांदकनाथ मंडळ या तिन्ही गणेशोत्सव मंडळानी एक आदर्शवत पाऊल उचलले असून  गणपती बरोबरच शेजारीच पंजाचीही  स्थापना केली आहे.  यातून माढेकरांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले आहे.

सोलापुरात जातीय सलोख्याची अनोखी परंपरा
author img

By

Published : Sep 9, 2019, 3:06 PM IST

सोलापूर - जिल्ह्यातील माढा शहरातील तीन गणेश मंडळानी गणेशोत्सव आणि मोहरम सण एकत्रित साजरा करत समाजीक जातीय सलोख्यासाठी एक आदर्श निर्माण केले आहे. माढ्यातील कसबा पेठेतील जगदंबा मंडळ, शुक्रवार पेठेतील अजिंक्यतारा गणेश मंडळ, सुवर्णयोगी नांदकनाथ मंडळ या तिन्ही गणेशोत्सव मंडळानी एक आदर्शवत पाऊल उचलले असून गणपती बरोबरच शेजारीच पंजाचीही स्थापना केली आहे. यातून माढेकरांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले.

सोलापुरात जातीय सलोख्याची अनोखी परंपरा

कसबा पेठेतील जगदंबा गणेश मंडळ व शुक्रवार पेठेतील अजिंक्यतारा गणेश मंडळ, नांदकनाथ गणेश मंडळ यामंडळाकडून गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविले जाते. तब्बल ६८ वर्षांनंतर मोहरम हा सण गणेशोत्सवाच्या काळात मागीलवर्षापासून येत असल्याने गतवर्षीपासूनच या मंडळांकडून असा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.

मोहरम सण हा दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला येत असल्याने वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जात होता. मागील वर्षापासून मोहरम सणही गणेशोत्सव काळात आल्याने या तिन्ही मंडळाच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी एका क्षणाचा ही विलंब न करता गणपतीच्या मूर्तीशेजारीच मोहरमचे पंजा व ताबूतची ही एकाच ठिकाणी स्थापना केली. सायंकाळी साडेसहा वाजता मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करुन गणेश मंडळाच्या सदस्यांसमवेत मोठ्या भक्तिमय वातावरणात ताबूतची प्रतिष्ठापना केली आहे.

जगदंबा गणेश मंडळाने मिरावलीसाब याच्या सवारीचे पंजे, श्रीमंत सुवर्णयोगी नादकनाथ मंडळाने नंदलालजी सवारी याचे पंजे, अजिंक्यतारा गणेश मंडळाच्या तंबुत पठाणसाब याचे पंजे ठेवण्यात आले आहेत.
नादकनाथ मंडळाचे संजय गोटे, नगरसेवक चंद्रशेखर गोटे, अध्यक्ष बाळासाहेब जगदाळे, रमेश जबडे, जगदंबा मंडळाचे अध्यक्ष महेश भांगे, अमोल कानडे, सचिन पाटील, अजिंक्यतारा मंडळाचे अध्यक्ष सतिश गोसावी, मोहम्मद बागवान, विजय ठोंबरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Intro:mh_sol_03_mohram_and_ganesh_7201168
एकाच ठिकाणी मोहरम व गणेशोत्सव माढ्यातील तीन गणेशोत्सव मंडळाने घडवले हिंदु मुस्लिम ऐक्याचे दर्शन सोलापूर- 
सोलापूर जिल्ह्यातील माढा शहरातील तीन गणेश मंडळानी गणेशोत्सव आणि मोहरण एकत्रित साजरा केला आहे. माढ्यातील  कसबा पेठेतील जगदंबा  मंडळ,शुक्रवार पेठेतील  अजिंक्यतारा गणेश मंडळ,सुवर्णयोगी नांदकनाथ मंडळ या तिन्ही   गणेशोत्सव मंडळानी एक आदर्शवत पाऊल उचलले असुन  गणपती बरोबरच शेजारीच  पंजाची ही  स्थापना करुन हिंदु मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले आहे.या मंडळानी दाखवुन दिलेले हिंदु मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले आहे. Body:कसबा पेठेतील जगदंबा  गणेश मंडळ व शुक्रवार पेठेतील  अजिंक्यतारा गणेश मंडळ,नांदकनाथ गणेश मंडळ या तिन्हीही मंडळे  गणेशोत्सव काळात विविध  सामाजिक  उपक्रम दरवर्षी  राबवित आले आहेत.68 वर्षांनंतर मोहरम  हा सण  गणेशोत्सवा च्या  काळात गतवर्षी(2018) पासुन एकत्रित येतो आहे.त्या नुसार या वर्षी व पुढील वर्षी देखील गणेशोत्सवाच्या काळात मोहरम देखील  सण एकत्रित येतो आहे.

मोहरम सण हा दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला येत असल्याने वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जात होता.गतवर्षी पासुन   मोहरम सण ही गणेशोत्सव काळात आल्याने या तिन्ही  मंडळाच्या सदस्य व पदाधिकारी यानी  क्षणाचा ही विलंब   (कसलाही विचार) न करता गणेश  मंडळानी आपल्या  गणपती च्या मुर्तीशेजारीच मोहरम चा पंजा व ताबूत ची ही  एकाच ठिकाणी  स्थापना केली आहे.
 सायंकाळी साडे सहा वाजता मुस्लिम बांधवांनी नमाज पटण करुन   गणेश  मंडळाच्या सदस्या समवेत   मोठ्या भक्तिभय वातावरणात ताबूत ची प्रतिष्ठापना केली आहे.
 जगदंबा गणेश मंडळाने मिरावलीसाब याच्या सवारीचे पंजे,श्रीमंत सुवर्णयोगी  नादकनाथ मंडळाने नंदलालजी सवारी याचे पंजे,अजिंक्यतारा गणेश मंडळाच्या तंबुत पठाणसाब याचे पंजे ठेवण्यात आलेत.
नादकनाथ मंडळाचे संजय गोटे,नगरसेवक चंद्रशेखर गोटे,अध्यक्ष बाळासाहेब जगदाळे,रमेश जबडे,जगदंबा मंडळाचे अध्यक्ष महेश भांगे,अमोल कानडे,सचिन पाटील,तर अजिंक्यतारा  मंडळाचे अध्यक्ष सतिश गोसावी,मंहमंद बागवान,विजय ठोंबरे याचे  कौतुक होत आहे
.मंडळानी मोहरमचे कार्यक्रम एकत्रित पार पडत असुन विद्युत रोषणाई,मंडप यासह सर्वच खर्च स्वतःह मंडळाने उचलला  आहे.गणेशोत्सव व मोहरम एकत्रित साजरा  करण्याचा हा मंडळाचा निर्णय सामाजिक सलोखा जतन करणारा असाच ठरला आहे. Conclusion:बाईट - 1 - महेश भांगे
 बाईट - 2 - अजय शहा 
बाईट - 3 - महंमद बागवान
बाईट - 4 - बाळासाहेब जगदाळे
बाईट -5 - सचिन पाटील 
बाईट - 6 - विजय ठोंबरे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.