ETV Bharat / state

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त 2 लाख 66 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 248 कोटी 84 लाखांचा मदत निधी - सोलापूर जिल्हा बातमी

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील 2 लाख 66 हजार शेतकऱ्यांना 248 कोटी 84 लाख रुपयांचा मदत निधी वाटप झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 5, 2020, 7:29 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 2 लाख 66 हजार शेतकऱ्यांना 248 कोटी 84 लाख रुपयांचा मदत निधी वाटप झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात काही तालुक्यात मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. शिवाय पुरामुळे घर पडलेले व जनावरे मृत्युमुखी झालेल्या नुकसानग्रस्त नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

अतिवृष्टीचा फटका सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, सांगोला, दक्षिण-उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, बार्शी या तालुक्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. ऑक्टोंबर महिन्यात सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सोलापूर जिल्हा कृषी विभागाकडून 11 तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. अतिवृष्टीमध्ये 2 लाख 66 हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता. प्रशासनाकडून मात्र 99 टक्के मदतीचे वाटप झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी

तालुकेशेतकरीमदत निधी (कोटीमध्ये)
उत्तर सोलापूर 9 हजार 34310.04
दक्षिण सोलापूर9 हजार 92312.08
अक्कलकोट14 हजार 68522.74
बार्शी30 हजार 96340.08
माढा31 हजार 20627.48
करमाळा14 हजार 2289.80
पंढरपूर34 हजार 17675.50
मोहोळ12 हजार 96917.29
मंगळवेढा41 हजार 2120.25
सांगोला45 हजार 71628.62
माळशिरस22 हजार 56611.90

हेही वाचा - दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना पाठिंबा दर्शवत सोलापुरात राष्ट्रवादीचे धरणे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.