ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी सोलापुरात साडेचार हजार कामगार रस्त्यावर... - कामगार कायद्यातील बदलांच्या विरोधात माकपचे आंदोलन

कामगार कायद्यातील बदलांच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) आज शहरात १० ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. देशभरातील कामगारांच्या प्रमुख १२ मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जवळपास साडेचार हजारांच्यावर कामगारांनी सहभाग घेतला.

solapur
विविध मागण्यांसाठी सोलापुरात साडेचार हजार कामगार रस्त्यावर...
author img

By

Published : Jan 8, 2020, 4:31 PM IST

सोलापूर - कामगार कायद्यातील बदलांच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) आज शहरात १० ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. देशभरातील कामगारांच्या प्रमुख १२ मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जवळपास साडेचार हजारांच्यावर कामगारांनी सहभाग घेतला.

विविध मागण्यांसाठी सोलापुरात साडेचार हजार कामगार रस्त्यावर...

सोलापुरातील जिल्हाधिकार कार्यालय, महानगरपालिका, गुरुनानक चौक, तुकाराम चौक आणि हैदराबाद नाका येथे आंदोलने करण्यात आली. आज बुधवार असल्याने एमआयडीसीतील यंत्रमाग आणि अन्य उद्योगांतील कामगारांना सुट्ट्या असल्याने कामगार मोठ्या प्रमाणात बाहेर पडले होते. या आंदोलनाच्या निमित्ताने जवळपास साडेचार हजार कामगार रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मात्र, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, सर्व खासगी-सहकारी बँका, शाळा, शासकीय रुग्णालय सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे शहरातील उपनगरात या कामगारांच्या आंदोलनांचा फारसा प्रभाव जाणवला नाही. पण आंदोलनाच्या ठिकाणी कामगारांच्या घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेला होता.

शासन खासदार आणि आमदारांना जुनी पेन्शन योजना लागू करू शकते, तर मग कर्मचाऱ्यांना का लागू करू शकत नाही? असा सवाल या आंदोलक कामगारांनी केला.

Intro:सोलापूर : सोलापुरात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना आणि बँक संघटना सहभागी झाल्याने आजच्या देशव्यापी संपाला धार आली.कामगार कायद्यातील बदलांच्या विरोधात माकपनं 10 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं. देशभरातील कामगारांच्या प्रमुख बारा मागण्यांसाठी सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय,महानगरपालिका,गुरुनानक चौक,तुकाराम चौक आणि हैदराबाद नाका येथे आंदोलनं करण्यात आली.

Body:आज बुधवार असल्याने एमआयडीसीतल्या यंत्रमाग आणि अन्य उद्योगांतील कामगारांना सुट्ट्या असल्याने कामगार मोठ्या प्रमाणात बाहेर पडले होते.या आंदोलनाच्या निमित्ताने जवळपास साडे चार हजार कामगार रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहावयास मिळाले.मात्र रेल्वे स्टेशन,बस स्थानक, सर्व खासगी-सहकारी बँका,शाळा, शासकीय रुग्णालय सुरळीत सुरु आहेत.त्यामुळं शहरातील उपनगरांत या कामगारांच्या आंदोलनांचा फारसा प्रभाव जाणवला नाही.पण आंदोलनाच्या ठिकाणी कामगारांच्या घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेला होता.

Conclusion:शासन खासदार आणि आमदारांना जुनी पेन्शन योजना लागू करू शकते, तर मग कर्मचाऱ्यांना का लागू करू शकत नाही ? असा सवाल या आंदोलक कामगारांनी या आजच्या आंदोलन दिनाच्या निमित्ताने उपस्थित केला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.