ETV Bharat / state

संतापजनक..! पित्याकडूनच चिमुकलीवर दुष्कर्म - पोलीस उपनिरीक्षक

पित्यानेच 8 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची तक्रारी पीडितेच्या आईने माढा पोलीस ठाण्यात दिली आहे. नराधम पित्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून वैद्यकीय अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Mar 3, 2020, 10:01 AM IST

सोलापूर - जन्मदात्या पित्यानेच 8 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याची घटना माढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे.

दरम्यान, अल्पवयीन पीडित मुलीच्या आईने माढा पोलिसांत त्याच्या पती विरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, नराधम बापाविरोधात बलात्कार व पॉक्सो कलमांतंर्गत सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. 'मागील दोन वर्षांपासून पती आपल्या मुलीसोबत दुष्कर्म करत आला असल्याचे नमूद करत 29 फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान घरी नसताना व रात्री झोपल्यानंतर आपल्या मुलीला उठवून तोंड दाबून वेळोवेळी तिच्यासोबत दुष्कर्म केले. आम्हाला कोणाला काही बोललात तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी ही धमकी देण्यात आली', असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, माढा पोलिसांनी त्या नराधम पित्याला ताब्यात घेतले आहे.

पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याची प्रकिया सुरू आहे. नाते संबधातच असलेली ही घटना पोलिसांत दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण घोगडे हे अधिक तपास करत आहेत.

याबाबत उपनिरीक्षक किरण घोगडेंना विचारले असता, घटनेचा सखोल तपास केला जाणार आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर येणाऱ्या अहवालाच्या दृष्टीने तपास होईल, असे सांगितले.

हेही वाचा - नांदेड : हुंड्यासाठी पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.