पंढरपूर (सोलापूर) - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. यंदा मानाचे वारकरी वर्धा जिल्ह्यातील केशव कोलते व इंदुबाई कोलते हे दाम्पत्य ठरले आहेत.
मुख्यमंत्री आठ तास चारचाकी चालून पंढपुरात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत पुत्र आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे हेदेखील आहेत. त्यांनी सहपत्नीक पुजा केली आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते कान्होपात्र ( तरटी) झाडाचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मानाच्या वारकऱ्यांचा पहाटे पावणेचारनंतर सत्कार होणार आहे. तसेच विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते कान्होपात्र ( तरटी) झाडाचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
वर्ध्याचे दाम्पत्य ठरले मानकरी-
प्रशासनाची आढावा बैठक घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पायी वारीला परवानगी देण्यात आली नाही. तरी दरवर्षीप्रमाणी शासकीय महापुजा पार पडली आहे. दरवर्षी प्रथमेप्रमाणे वारकऱ्याला महापुजेत मान दिला आहे. यंदा वर्धा जिल्ह्यातील केशव कोलते आणि इंदुबाई कोलते हे महापुजेचे मानकरी ठरले आहेत.
हेही वाचा-Pegasus Snooping : अमित शाहांनी राजीनामा देण्याची काँग्रेसची मागणी; वाचा, काय आहे प्रकरण?
लसीकरणावर अधिक भर
आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. प्रशासन, आरोग्य विभागाने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उल्लेखनीय काम केले आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता बाळगा. जिल्ह्यात टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या. नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या. ऑगस्ट, सप्टेंबरपासून लसीचा पुरवठा सुरळित होईल. ऑक्सिजनची उपलब्धता आणि लागणारी गरज याचे योग्य नियोजन करा. ऑक्सिजनचा अधिक साठा करण्यावर भर द्यावा. अर्थचक्र थांबू नये म्हणून कोरोनाचे नियम पाळून उद्योग-धंदे सुरू आहेत. कामगारांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या तसेच खाजगी दवाखान्यातून लस घेण्यास परवानगी दिली असल्याने उद्योगांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर अधिकाधिक भर द्यावा.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक घेतले विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन
यंदा राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊ दे. माझ्या राज्यातला बळीराजा सुखी होऊ दे. त्याच्या शेतशिवारात, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊ दे. बा पांडुरंगा, जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकर दूर कर. सर्वांना निरोगी, सुखी, समाधानी, आनंदी ठेव" असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पांडुरंगाच्या आणि माता रुक्मिणीच्या चरणी घातले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर येथे सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी समस्त वारकरी बांधवांना, राज्यातील नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.