ETV Bharat / state

सोलापुरात 31 लाख नागरिकांना मिळणार लसीकरणाचा लाभ

लसीकरण मोहीम पूर्ण राज्यामध्ये राबवली जाणार आहे. ही मोहीम पूर्णपणे नि:शुल्क असणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 31 लाख नागरिकांना मोफत लसीचे डोस दिले जाणार आहे.

सोलापूर लसीकरण
सोलापूर लसीकरण
author img

By

Published : Apr 29, 2021, 4:02 PM IST

सोलापूर - राज्यासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 18 ते 45 वयोगटातील प्रत्येकाला लस देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून नियोजन केले जात आहे. जिल्ह्यातील 46 लाख 65 हजार नागरिकांपैकी पहिल्या टप्प्यात 31 लाख नागरिकांची लसीकरण मोहीम पार पडणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात मोफत लसीकरण मोहीम

राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून 45 वर्षवरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र तसेच राज्य सरकारने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना 1 मेपासून लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण मोहीम पूर्ण राज्यामध्ये राबवली जाणार आहे. ही मोहीम पूर्णपणे नि:शुल्क असणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 31 लाख नागरिकांना मोफत लसीचे डोस दिले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहीम पूर्ण

कोरोनाच्या पहिल्या लाटेतील बाधितांमध्ये ज्येष्ठ नागरिक व इतर आजार असणाऱ्यांची संख्या जास्त होती. 16 जानेवारीपासून 45 वर्ष वयोगटावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. 45 वर्ष वयोगटातील व्यक्तींना कोरोना विषाणूसोबत लढता यावे म्हणून त्यांना पहिल्या लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यात दहा लाख नागरिकांना लसीकरण होणे गरजेचे होते. मात्र,अडीच लाख नागरिकांनी याचा लाभ घेतल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे.

जिल्ह्यात लसींचा तुटवडा

सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. जिल्ह्यातील 46 लाख नागरिकांपैकी सुमारे 31 लाख नागरिक लसीकरण मोहिमेत सहभागी होणार आहे. मात्र सध्या जिल्ह्यामध्ये लसींचा मोठा तुटवडा आहे. त्यातच 1 मेपासून चालू होणारे लसीकरणात मोठी मागणी असणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 1 मेपासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

इतके लसीकरण केंद्र कार्यरत असणार

सोलापूर जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात आहे. त्यामध्ये 18 वर्षावरील सर्व नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. त्यात जिल्ह्यात सध्या 131 लसीकरण केंद्रावर लसीकरण केल्या जात आहे.त्यामध्ये जिल्ह्यातील 105 शासकीय केंद्र तर 26 खाजगी केंद्रांवर लसीकरण केले जाते आहे. मात्र 1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून 339 केंद्र असणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.