ETV Bharat / state

सोलापूर शहराला लागून असलेल्या हिप्परगा तलावातून शहरात पाणी शिरण्याची शक्यता, अधिकाऱ्यांची पाहणी

अतिवृष्टीमुळे हिप्परगा तलाव तुडुंब भरले आहे. तलावाच्या सांडव्यातून शहरातील वस्त्यांत पाणी शिरण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना स्थानिक नगरसेवकांनी व सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

Hipparga Lake full, solapur municipal corporation declared Alert for citizens
सोलापूर शहराला लागून असलेल्या हिप्परगा तलावातून शहरात पाणी शिरण्याची शक्यता
author img

By

Published : Oct 21, 2020, 10:25 AM IST

सोलापूर - महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हिप्परगा येथे तलावाची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे हे तलाव तुडुंब भरले आहे. तलावाच्या सांडव्यातून शहरातील वस्त्यांत पाणी शिरण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना स्थानिक नगरसेवकांनी व सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

या वेळी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक अविनाश पाटील, भाजपा संघटन सरचिटणीस बिजूअण्णा प्रधाने, मनपा अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार विजयकुमार देशमुख बोलताना...

सोलापूर शहरात गेल्या आठ दिवसापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे हिप्परगा तलाव हे पूर्ण क्षमतेने भरले आहे. तसेच, अजून पुढे काही दिवस पाऊस येण्याची शक्यता असल्याने हिप्परगा तलावातील पाणी पातळी वाढू शकते. पाणी वाढल्यास सांडव्याच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील बाळे, शिवाजीनगर या भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे.

तसेच, नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्या कारणाने त्या भागातील नागरिकांसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आजूबाजूच्या शाळा, मंगल कार्यालय या ठिकाणी तात्पुरता निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महापालिकेचे झोन अधिकारी यांना त्या ठिकाणी नेमण्यात आले आहे. त्या भागातील नागरिकांनी अडचण असल्यास संबंधित झोन अधिकाऱ्यांना संपर्क करावा आणि नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अशी थिल्लरबाजी करू नये, देवेंद्र फडणवीसांचा टोला

हेही वाचा - धक्कादायक..! वृद्ध कोरोनाबाधिताचा क्वारंटाईन सेंटरमध्ये गळफास; कारण अस्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.