ETV Bharat / state

सोलापुरात 'हस्त' बसरला, रब्बी पेरणीला येणार वेग - सोलापूर जिल्हा बातमी

शनिवारी (दि. 10 ऑक्टोबर) सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांच्या रखडलेल्या पेरण्यांना आता वेग येणार आहे.

पीक
पीक
author img

By

Published : Oct 10, 2020, 8:45 PM IST

Updated : Oct 10, 2020, 9:17 PM IST

सोलापूर - रब्बी पिकांच्या पेरणीसाठी प्रतिक्षा करत असलेल्या बळीराजाला हस्त नक्षत्राच्या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील रब्बी पेरणीला वेग येणार आहे. पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे शेतकर्‍यांना पेरणी करणे कठीण झाले होते. पण, शनिवारी झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोलापुरात 'हस्त' बसरला

शनिवारी सकाळपासूनच उखाडा जाणवत होता. दुपारी साडेतीनच्या दरम्यान पावसाला सुरूवात झाली. सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. शहरातील अनेक भागात रस्त्यावर पाणी वाहत होते. या पावसामुळे शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांची चांगलीच धांदल उडाली होती.

यंदा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी उडीद, मूग, सोयाबीनचे पीक घेतले आहेत. 15 ते 20 दिवसांच्या विश्रांतीनंतर शेतकर्‍यांनी मूग, उडीद, सोयाबीनचे पीक काढले आहे. ज्या शेतकर्‍यांचे पीक चांगले आले आहे त्या शेतकर्‍यांना चार पैसे देखील या पिकाच्या माध्यमातून हाती लागले आहेत.

त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीदाचे पीकाचे उत्पादन घेतल्यानंतर शेतकरी जमिनीची मशागत करून ठेवले होते. पण, पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गामध्ये चितेंचे ढग पसरले होते. जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे ज्वारी पिकाची पेरणी करायची कशी असा प्रश्‍न पडला होता. पण, शनिवारी (दि. 10 ऑक्टोबर) झालेल्या पावसाने शेतकर्‍यांना पुरेशा प्रमाणात पेरणी करण्याइतपत पाऊस झाला आहे. सध्या जिल्ह्यातील काही तालुक्यात पेरणीला सुरूवात देखील झाली आहे. मात्र, काही तालुक्यात पाऊस नसल्यामुळे तेथील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत, यामुळे पेरण्या पुढे ढकलल्या जाणार आहेत.

हेही वाचा - माळशिरसमध्ये दुर्मिळ मांडुळ जातीचे तस्करी करणारे तीन जण पोलिसांच्या ताब्यात

Last Updated : Oct 10, 2020, 9:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.