ETV Bharat / state

संतापजनक! खरीप अनुदानापोटी सरकारने शेतकऱ्याला दिले फक्त चार रुपये - crop subsidy

सरकारने माढा तालुक्यातील पंडित इंगळे या शेतकऱ्याला खरीपाचे अनुदान म्हणून फक्त ४ रुपये दिले आहेत.

पंडित इंगळे
author img

By

Published : May 22, 2019, 3:45 PM IST

सोलापूर - सरकारने माढा तालुक्यातील एका शेतकऱ्याला खरीपाचे अनुदान म्हणून फक्त ४ रुपये देऊन त्याची क्रूर चेष्टा केली आहे. पंडित इंगळे असे या शेतकऱ्याचे नाव असून तो ढवळस गावाचा रहिवासी आहे.

पंडित इंगळे

सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत . सरकारी पातळीवर शेतकऱ्यांना मदत केली जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, सरकारने इंगळे यांना फक्त ४ रुपये देऊन शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

इंगळे यांची १ एकर जमीन असून सुरुवातीला त्यांनी आपल्या जमिनीत उस लावला. मात्र, तो जळून गेल्याने त्यांनी त्यात तूर लावली होती. तूरही जळून गेल्यानंतर पंचनामा करायला आलेल्या तलाठ्याला ही वस्तुस्थिती त्यानी दाखवली. त्यानंतर सरकारकडून केवळ ४ रुपयाचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. सरकारने ४ रुपये जमा करून माझी चेष्ठा केल्याचे इंगळे यांनी म्हटले आहे. बँकेतून कमीतकमी ५०० रुपये काढता येतात, असे असताना सरकारने दिलेले ४ रूपये कसे काढायचे, असा प्रश्न इंगळे यांना पडला आहे.

Intro:माढ्याच्या इंगळेंना सरकारचा इंगा
खरीप अनुदाना पोटी सरकारने दिले फक्त चार रुपये
सोलापूर-
सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील एका शेतकऱ्याला खरिपाचे मदतीने अनुदान म्हणून फक्त चार रुपये देऊन त्या शेतकऱ्यांची सरकारने क्रूर चेष्टा केली आहे अगोदरच दुष्काळाने होरपळलेल्या या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ टाकण्याचे काम सरकारच्या चार रुपयाच्या अनुदाने केले आहे. Body:सोलापुरातल्या माढा तालुक्यातील ढवळस या गावातील पंडित इंगळे या शेतकऱ्याला खरीपाचे अनुदान म्हणून फक्त ४ रुपये मिळाले आहेत. सरकार एकीकडे शेतकऱ्याचा कळवळा दाखविण्याचा प्रयत्न करत असतानाच अश्या प्रकारे अनुदान देऊन शेतकऱ्याची क्रूर चेष्टा करणाऱ्या सरकारबाबत संताप व्यक्त केला जातोय.
सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत . सरकारी पातळीवर शेतकऱ्यांना मदत केले जात असल्याचा दावा केला जात आहे . मात्र माढा तालुक्यातील ढवळस येथील शेतकरी पंडित इंगळे यांना जी मदत मिळाली आहे ,त्या मदतीची किंमत पाहून ते थोड्यावेळासाठी चक्रावूनच गेले. सरकारने मदत दिली नसते तर चालले असते पण 4 रुपये देऊन सरकारने आपली क्रुर चेष्टा केली आहे असं आता पंडित इंगळे यांना वाटत आहे.
पंडीत इंगळे यांना राज्य सरकारने दुष्काळ निधीपोटी ४ रु दिले आहेत .
मदतीची एकीकडे प्रतीक्षा असताना त्यात केवळ चार रुपये अनुदान देऊन सरकारने शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
पंडीत इंगळे यांची एक एकर जमीन असून सुरुवातीला त्यांनी आपल्या जमिनीत उस लावला. मात्र तो जळून गेल्याने त्यांनी त्यात तूर लावली होती. तूरही जळून गेल्यानंतर पंचनामा करायला आलेल्या तलाठ्याला ही वस्तुस्थिती त्यानी दाखवली होती. मात्र सरकारकडून खरिपाला केवळ चार रुपयाचे अनुदान त्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहे. सरकारने चार रुपये जमा करून माझी चेष्ठाच केल्याचं इंगळे यांनी म्हटलंय , बॅंकेतून कमीतकमी ५०० रुपये काढता येतात असे असताना सरकारने दिलेले चार रूपये कसे काढायचे असा प्रश्न इंगळे यांना पडलाय ,

बाईट ---पंडित इंगळे ( शेतकरी )Conclusion:नोट- शेतकरी यांचे फोटो ऑफिस व्हाट्स अप वर पाठविले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.