ETV Bharat / state

पंढरपुरातील आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 'त्या' पत्रकारावर खंडणीसह बलात्काराचा गुन्हा - अभिराज

दोन दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकार अभिराज उबाळे याच्या विरोधात बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा पंढरपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

अभिराज उबाळे (छाया - सोशल मिडीया)
author img

By

Published : Jun 24, 2019, 1:27 PM IST

Updated : Jun 24, 2019, 3:14 PM IST

सोलापूर - आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकारावर बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा पंढरपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी राजकीय नेते, पोलीस निरीक्षक, पत्रकार आणि महिलेच्या त्रासास कंटाळून पत्रकार अभिराज उबाळेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

अभिराज मधुकर उबाळे (रा.आंबेडकर नगर, पंढरपूर) याने २०१३ ते फेब्रुवारी २०१९ अखेर या कालावधीत पीडित महिलेस लग्नाचे अमिष दाखवून व धमकी देवून बलात्कार केला. तसेच पीडितेसोबतचे अश्लिल फोटो, व्हिडीओ समजामाध्यमात पसरविण्याची धमकी देत ७ लाख रूपयांची खंडणी घेतली. आणखी ३ लाख रूपयांची खंडणी मागत असल्याची तक्रार पोलिसांकडे पीडितेने दिली होती. यावरून अभिराज उबाळे व अन्य एका अशा दोन आरोपींविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम ३७६, ४१७, ३८४, ३८५,५००,५०६, ३४ तसेच भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३,२५ प्रमाणे पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पंढरपूर शहर पोलीस करत आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 24, 2019, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.