ETV Bharat / state

मोक्षदा एकादशीला भाविक 'बा विठ्ठला'च्या भेटीला; मात्र, कोरोनाच्या नियमांचे पालन नाहीच... - devotees crowd pandharpur

कडाक्याच्या थंडीतील पवित्र स्नान झाल्यानंतर ऑनलाईन बुकींग केलेल्या भाविक दर्शनरांगेकडे मार्गस्थ झाले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, तीन हजार भाविकांना पांडुरंगाचे मुख दर्शन घेता आले.

devotees in pandharpur on mokashada ekadashi in pandharpur
पंढरीत भाविकांची गर्दी...
author img

By

Published : Dec 25, 2020, 9:09 PM IST

Updated : Dec 25, 2020, 9:30 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - ख्रिसमस सण आणि मोक्षदा एकादशीचा योग साधत काही भाविकांनी गर्दी पाहायला मिळाली. पंढरीत भाविक काल (गुरुवारी) रात्रीच मुक्कामी दाखल झाले होते. तर काही भाविक पहाटेपासूनच पंढरीत आले होते. त्यामुळे स्टेशन रस्ता, शिवाजी चौक, भक्तीमार्ग, चंद्रभागा वाळवंटात भाविकांची गर्दी झाली होती. या गर्दीमध्ये कोणत्याही प्रकारचे कोरोना नियमांचे पालन न झाल्याचे दिसून आले.

पंढरीत भाविकांची गर्दी...

कडाक्याच्या थंडीतील पवित्र स्नान झाल्यानंतर ऑनलाईन बुकींग केलेल्या भाविक दर्शनरांगेकडे मार्गस्थ झाले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, तीन हजार भाविकांना पांडुरंगाचे मुख दर्शन घेता आले.

पंढरीतील बाजारपेठ फुल्ली -

पंढरीत मोक्षदा एकादशीनिमित्त गर्दी वाढल्याने ज्या भाविकांचे ऑनलाईन दर्शन बुकिंग नव्हते, त्यांनी मुखदर्शन, नामदेव पायरी दर्शन घेतले. विठू माऊलीचे नामस्मरण केले. सावळ्या विठूरायाचे दर्शन घेऊन धन्य झाल्यानंतर परत गावाकडे जाणाऱ्या वारकऱ्यांनी मिठाईच्या दुकानांत गर्दी केली. अनेक भाविकांनी प्रसाद म्हणून पेढे, चिरमुरे, बत्ताशे, हळदी, कुंकू, बुक्का खरेदी केला. तसेच घरातील बाळगोपाळांसाठी खेळणी घेतली. महिला भाविकांनी समई, पणत्या, पंचपाळा यांसह संसारिक साहित्याची खरेदी केल्याचे दिसून आले. कोरोना महामारीमुळे सात महिने विठ्ठल मंदिर बंद होते. मंदिर परिसरातील दुकानाची आर्थिक घडी विस्कळीत झाली होती. दोन महिन्यापासून विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यामुळे दुकानाची आर्थिक घडी पूर्वपदावर येताना दिसत आहे.

हेही वाचा - पंढरपूर; विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील भंग पावलेल्या मूर्तींची नव्याने प्राणप्रतिष्ठाना

पंढरीत आलेले 24 सायकल रायडर कोरोना पॉझिटिव्ह -

नाशिक जिल्ह्यातील जानोरी (ता. दिंडोरी) गावातील 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हे 24 भाविक सायकल रॅलीने पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी आले होते. दर्शन आटपून हे भाविक गावी परतल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती जानोरी ग्रामपंचायतीने प्रसिद्धीपत्रक काढून दिली.

विठुराय आणि रूक्मिणीमातेच्या कपाळावर चंदन गंधासह तुळशीपत्र -

मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशीनिमित्त विठ्ठल आणि रूक्मिणीमातेच्या कपाळावर चंदन गंधासह तुळशीपत्रही लावण्यात आले. प्रत्येक एकादशीला देवांना कपाळावर, असे तुळशीपत्र लावण्यात येते. तसेच थंडीमुळे कानपट्टी, उबदार शालही पांघरण्यात आली आहे. मार्गशीर्ष मास केशव मास म्हणून ओळखला जातो. म्हणून या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते. हिंदू धर्मात एकादशीला अतिशय महत्त्व असते. वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात. अधिक मास आल्यास त्यात आणखी दोन एकादशींची भर पडून त्या २६ होतात. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात येणारी एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असते.

Last Updated : Dec 25, 2020, 9:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.