पंढरपूर - येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मास्क काढून भाषण करण्याची विनंती करण्यात आली, मात्र त्यांनी यास नकार दिला. भाजपा नेते व चंद्रभागा साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालक मंत्री दत्ता मामा भरणे यांची उपस्थिती होती.
दिलगिरी व्यक्त
कल्याणराव काळे यांच्या प्रवेशसभेत बोलताना अजित पवार यांना एक कार्यकर्त्याकडून चिठ्ठीद्वारे मास्क न लावता बोलण्याची मागणी करण्यात आली. मात्र त्यांनी आपण मास्क काढणार नाही, असे भर सभेत सांगितले. मात्र त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कार्यकर्त्यांच्या गर्दीबद्दल अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. सभेमध्ये कार्यकर्त्यांनी दाटीवाटी केली होती.