सोलापूर - सीपीआय (एम) नेते नरसय्या आडम यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या महिन्यात सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत व्यासपीठावरून भाषण केले होते.
नरसय्या आडम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या व्यासपीठावर भाषण केले होते. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे कारण देत सीपीआय (एम)ने त्यांची तीन महिन्यांसाठी सेंट्रल कमिटीतून हकालपट्टी केली आहे.
आडम मास्तर यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरुन कौतुक केले होते. विडी कामगार व इतर कष्टकरी समाजासाठी त्यांनी हातात घेतलेल्या ३० हजार घरांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते.
आघाडी सरकारच्या काळात दाबून ठेवलेली फाईल भाजप सरकारने मंजूर करुन निधी देखील दिला. त्यामुळेच मोदी सरकारचे कौतुक केले, असेही आडम मास्तर यांनी स्पष्ट केले होते.