ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यातील 687 गावे कोरोना मुक्त, काही तालुक्यात निर्बंध; तर काही तालुक्यात शिथिलता - महाराष्ट्रात संचारबंदी

सोलापूर - कोरोना नियमात शिथिलता देण्यात येत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर शहरासह पाच तालुक्यात संचारबंदी लागू केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 1243 गावांपैकी 687 गावांमध्ये एकाही कोरोनाबाधिताची नोंद नाही. त्यातील दहापेक्षा अधिक रुग्ण असलेले 118 गावे आहेत. तर, दहापेक्षा कमी असलेले 560 गावांचा समावेश असल्याची माहिती, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 687 गावे कोरोना मुक्त, काही तालुक्यात निर्बंध; तर काही तालुक्यात शिथिलता

author img

By

Published : Aug 16, 2021, 7:12 PM IST

सोलापूर (पंढरपूर) - राज्यात कोरोना नियमात शिथिलता देण्यात येत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर शहरासह पाच तालुक्यात संचारबंदी लागू केली आहे. काही तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 1243 गावांपैकी 687 गावांमध्ये एकाही कोरोनाबाधिताची नोंद नाही. त्यातील दहापेक्षा अधिक रुग्ण असलेले 118 गावे आहेत. तर, दहापेक्षा कमी असलेले 560 गावांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

'जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये संचारबंदी तर काही तालुक्यात शिथिलता'

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा विचार करून जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कडक निर्बंध लागले आहेत. यामध्ये पंढरपूर, सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा या तालुक्यात दहा दिवसाची संचारबंदी 13 ऑगस्टपसून लागू केली आहे. तर, उर्वरित तालुक्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव कमी आहे. त्यामुळे त्या तालुक्यात संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तरी जिल्हा प्रशासनाकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. आरोग्य विभागाकडून कोरोना चाचणीवर भर दिला जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

'त्या गावातील सर्व कुटुंबाची तपासणी होणार'

सोलापूर जिल्ह्यातील 1243 पैकी 687 गावांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. 10 पेक्षा अधिक रुग्ण असलेले 118 गावे आहेत. तर, 10 पेक्षा कमी रुग्ण असलेले 560 गावांचा समावेश आहे. 10 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांमध्ये सर्वाधिक पंढरपूर तालुक्यातील 33 गावांचा समावेश आहे. ज्या गावांमध्ये 10 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. त्या गावातील सर्व कुटुंबाची तपासणी करण्यात येणार आहे.

'कोरोना रुग्ण नसलेले 687 गावे'

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण नसलेले 687 गावे आहेत. यामध्ये अक्कलकोट 130, बार्शी 94, करमाळा 142, सांगोला 30, माढा 28, माळशिरस 13, मंगळवेढा 53, मोहोळ 70, दक्षिण सोलापूर 79, उत्तर सोलापूर 37, पंढरपूर 16 गावांचा समावेश आहे.10 पेक्षा अधिक रुग्ण 118गावे आहेत. यामध्ये पंढरपूर 33, करमाळा 11, सांगोला 21, माढा 21, माळशिरस 28, मोहोळ 3 गावांचा समावेश आहे. 10 पेक्षा कमी रूग्ण असलेले 474 गावे आहेत. यामध्ये अक्क्लकोट 2, बार्शी 45, करमाळा 70, सांगोला 52, माढा 71, माळशिरस 76, मंगळवेढा 28, मोहोळ 28, दक्षिण सोलापूर 11, उत्तर सोलापूर 8, पंढरपूर 84 गावांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.