ETV Bharat / state

पवारांची टीम संपली, राज्यात आता आमचीच टीम - मुख्यमंत्री - loksabha2019

जर कोणी दबाव टाकत असेल तर दबाव टाकणाऱ्यांची रातोरात परिस्थिती बदलून टाकेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Apr 10, 2019, 9:09 PM IST

सोलापूर - पवारांची टीम आता संपली असून राज्यात फक्त आमचीच टीम काम करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पंढरपूर येथील सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवारांवरही जोरदार टीका केली. तसेच राज्यात दबाव टाकणाऱ्यांचे दिवस संपले आहेत. जर कोणी दबाव टाकत असेल तर दबाव टाकणाऱ्यांची रातोरात परिस्थिती बदलून टाकेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

काँग्रेसचे पंढरपूर तालुक्यातील नेते कल्याण काळे यांनी काँग्रेसला रामराम करून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. काळे यांच्या प्रवेशासोबतच माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात प्रचार सभा घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवारांसोबतच मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवरदेखील टीका केली. आम्ही सत्तेत आल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची कामे केलेली आहेत. त्या सर्वांनाच आम्ही पक्षात घ्यायचे ठरवले, तर अर्धी राष्ट्रवादी आणि काँग्रेस रिकामी होईल, असेही ते म्हणाले.

दबाव टाकणाऱ्यांची रातोरात परिस्थिती बदलून टाकीन - मुख्यमंत्री
काँग्रेसचे पंढरपुरातील नेते कल्याण काळे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करत असताना प्रवेश करू नये, यासाठी कल्याण काळे यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. याविषयावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रातील दबाव टाकणाऱ्यांचे दिवस आता गेले आहेत. काळे, तुमच्यावर जर कोणी दबाव टाकला तर दबाव टाकणाऱ्याची परिस्थिती रातोरात बदलून टाकीन, असे सांगत आपण तुमच्या कायम पाठिशी असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी काळे यांना दिले.

Intro:दबाव टाकणाऱ्यांची रातोरात परिस्थिती बदलून टाकेल- मुख्यमंत्री
पवारांची टीम संपली, राज्यात आता आमचीच टीम
मूख्यमंत्र्यांची पवारांवर टीका,

सोलापूर-
पवारांची टीम संपली असून राज्यात फक्त आमचीच टीम काम करणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पंढरपूर येथील मूख्यमंत्री बोलत होते यावेळी त्यांनी शरद पवारांवरही जोरदार टीका केली. तसेच राज्यात दबाव टाकणाऱ्यांचे दिवस संपले आहेत. जर कोणी दबाव टाकत असेल तर दबाव टाकणाऱ्यांची रातोरात परिस्थिती बदलून टाकेल असेही मूख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. Body:कॉंग्रेसचे पंढरपूर तालूक्यातील नेते कल्याण काळे यांनी कॉंग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. राज्याचे मूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण काळे यांना भाजपामध्ये प्रवेश दिला. कल्याण काळे यांच्या प्रवेशासोबतच माढ्यातील भाजपाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरात प्रचार सभा घेतली.
यावेळी बोलतांना मूख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवारांसोबतच मूख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेंत्यावर देखील टीका केली. आम्ही सत्तेत आल्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची कामे केलेली आहेत. त्या सर्वांनाच आम्ही पक्षात घ्यायचे ठरवले तर आर्धी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस रिकामी होईल असेही मूख्यमंत्र्यांनी सांगितले.

दबाव टाकणाऱ्यांची रातोरात परिस्थिती बदलून टाकीन- मूख्यमंत्री
कॉंग्रेसचे पंढरपूरातील नेते कल्याण काळे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश करत असतांना प्रवेश करू नये यासाठी कल्याण काळे यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. याविषयावर बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की. महाराष्ट्रातील दबाव टाकणाऱ्याचे दिवस आता गेले आहेत. कल्याणराव काळे तूमच्यावर जर कोणी दबाव टाकला तरी दबाव टाकणाऱ्याची परिस्थिती रातोरात बदलून टाकीन असे सांगत आपण तूमच्या कायम पाठिशी असल्याचे मूख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.