ETV Bharat / state

अपघात करुन पळ काढणाऱ्या चारचाकीस पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले

सोलापूर-पुणे महामर्गावरील मोहोळ येथे एका दुचाकीस्वारास धडक देऊन पळून जाणाऱ्या चारचाकीला पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन ताब्यात घेतले आहे.

पोलीस पथक
पोलीस पथक
author img

By

Published : Jan 12, 2021, 3:19 PM IST

सोलापूर - सोलापूर-पुणे (क्र. 65) महामार्गावर मोहोळ येथे एका मोटारीने दुचाकीस्वारासास धडक दिली. अपघातानंतर मोटार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोडनिंब शिवारात त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करुन चालकास ताब्यात घेतले.

सोमवारी (दि. 11 जाने.) रात्री सोलापूरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने (क्र. एम एच 43 बीपी 9995) दुचाकीस्वारास धडक दिली. अपघानंतर जखमीला मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देताना घटनास्थळावरुन पळ काढला. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्याला अडविण्याच प्रयत्न केला. मात्र, तो तसाच सुसाट पुण्याच्या दिशेने गेला. नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून संबंधित मोटार व चालकाबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या मोटारीचा सिनेस्टाईल पाठलाग करुन मोडनिंब शिवारात वरवडे टोलनाका मार्गावर मोटारचालकास अडवले व ताब्यात घेतले.

हेही वाचा - पंढरपूर; वाळू चोरी प्रकरणातील 36 गाढवे निघाली उटीला

हेही वाचा - नंदीध्वजाचे पूजन करून सिद्धेश्वर महायात्रेला प्रारंभ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.