ETV Bharat / state

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाची रक्तदान चळवळ - धनगर समाज आरक्षण मागणी न्यूज

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी भाजपा प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता राज्य सरकारच्या विरोधात रक्तदान चळवळ सुरू केली आहे. रक्तदान आंदोलन पुढचे सात दिवस सुरू राहणार आहे. या अनोख्या रक्तदान आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

धनगर समाजाची रक्तदान चळवळ
धनगर समाजाची रक्तदान चळवळ
author img

By

Published : Oct 4, 2020, 6:41 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी भाजपा प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता राज्य सरकारच्या विरोधात रक्तदान चळवळ सुरू केली आहे. रक्तदान आंदोलन पुढचे सात दिवस सुरू राहणार आहे. या काळात जवळपास दहा ते पंधरा हजार रक्त बाटल्यांचे संकलन करून ते सरकारला दान करण्यात येणार आहे.

या अनोख्या रक्तदान आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसांमध्ये राज्यभरातील सुमारे साडेतीन हजाराहून अधिक धनगर समाज बांधवांनी रक्तदान करुन सरकार विरोधातील आपला रोष व्यक्त केला आहे.

हेही वाचा - पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका; १ लाख हेक्टरवरील पिके वाया

सध्या देशात आणि राज्यात कोरोना महामारीचे मोठे संकट उभे आहे. अशा संकट काळात अनेक रुग्णांचे रक्ताअभावी प्राण जात आहेत. १ ऑक्‍टोबर रोजी सुरू झालेली रक्तदान चळवळ राज्यभरात दहा दिवस राबवली जाणार आहे. जिल्ह्यातही रक्तदान आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, मोहोळ आदी भागातील जवळपास एक हजार 13 लोकांनी रक्तदान करुन आरक्षण मागणी आंदोलनाला पाठिंबा दिल्याची माहिती धनगर आरक्षण कृती समितीचे प्रा. सुभाष मस्के व बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांनी दिली.

हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्याने शोधली 'प्रकाशवाट'; हळद पावडर तयार करून विक्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.