मंगळवेढा ( सोलापूर ) - मंगळवेढा तालुक्याचा आर्थिक कणा आणि राजकारणामध्ये प्रतिष्ठेच्या ठरलेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तांतर झाले आहे. समविचारी गटाचे 19 उमेदवार मोठ्या फरकाने विजयी ( Bhalake Paricharak Win Sant Damaji Sakhar Karkhana Election ) झाले. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी कारखान्याचे चेअरमन व पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात परिचारक व भालके गट यांच्यासह स्थानिक नेत्यांनी समविचारी आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली ( MLA Samadhan Autade Looses Sant Damaji Sakhar Karkhana Election ) होती.
विद्यमान चेअरमनचा पराभव - चुरशीने झालेल्या या निवडणुकीत 24 हजार 521 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणी होऊन चार फेऱ्यात झालेल्या मतमोजणीमध्ये प्रत्येक फेरीत सम विचारी उमेदवार आघाडीवर राहिले. या निवडणुकीमध्ये मंगळवेढ्यातील स्थानिक भाजप मध्ये बंड होत. भाजपच्या काही शिलेदारांनी आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात दंड थोपटले होत. त्यामध्ये कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष समाधान आवताडे, उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी यांच्यासह जवळपास दहा विद्यमान संचालकांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
रोष मतपेटीतून व्यक्त - संस्था वाचवण्याच्या दृष्टीने दामाजीची निवडणूक सभासदांनी हातात घेतली. ऊस उत्पादक सभासदांचा ऊस वेळेत गाळप न करणे, कामगारांच्या पगारी न देणे या सर्वच बाजूंनी सत्ताधाऱ्यावर रोष होता. तो रोष त्यांनी मतपेटीतून व्यक्त केला, असे मत समविचारी आघाडीचे प्रमुख शिवानंद पाटील यांनी बोलताना सांगितले.
हेही वाचा - State Cabinet Meeting : औरंगाबाद आणि उस्मानाबादचे पुन्हा नामांतर, नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव