ETV Bharat / state

प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बहुजन समाज पार्टी मैदानात - सोलापूर

भाजपला मदत व्हावी अशीच भूमिका घेतली जात असल्याने बसपा या निवडणुकीत आंबेडकर यांना विरोध करत असल्याचे बसपा नेते संजीव सदाफुले यांनी म्हटले आहे. दलित नेत्यांचं ऐक्य भासविण्यासाठी भाजपच्याच नगरसेवकांनी गर्दी जमविल्याचा आरोप बसपा उमेदवार राहुल सरवदे यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बहुजन समाज पार्टी मैदानात
author img

By

Published : Mar 26, 2019, 11:32 PM IST

सोलापूर - वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीला बहुजन समाज पक्षाने आव्हान दिले आहे. राहुल सरवदे यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात आपला उमेदवारी अर्ज भरला आहे त्यामुळं दलित मतांवर डोळा ठेवून सुरु असलेल्या राजकारणाला नवं वळण मिळाले आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बहुजन समाज पार्टी मैदानात

आंबेडकरांनी काल सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरत शक्तिप्रदर्शन केले होते. त्याला मायावतींच्या बसपाच्यावतीने आक्षेप घेतला गेलाय. भाजपला मदत व्हावी अशीच भूमिका घेतली जात असल्याने बसपा या निवडणुकीत आंबेडकर यांना विरोध करत असल्याचे बसपा नेते संजीव सदाफुले यांनी म्हटले आहे.

दलित नेत्यांचं ऐक्य भासविण्यासाठी भाजपच्याच नगरसेवकांनी गर्दी जमविल्याचा आरोप बसपा उमेदवार राहुल सरवदे यांनी केला आहे. त्यामुळं आंबेडकर नावाचे भांडवल करत आता दलित नेतृत्वात सुरु झालेल्या चिखलफेकीमुळं सर्वसामान्य कार्यकर्ते गोंधळून गेले आहेत.

Intro:सोलापूर : सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधातील राजकारणामुळं बहुजन समाज पार्टीत दोन गट पडले आहेत.एका गटाने आंबेडकर भाजपला पूरक भूमिका घेत असल्याचा आरोप करत विरोध दर्शविला आहे.तर दुसरीकडे महानगरपालिकेतील गटनेते आनंद चंदनशिवे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचं समर्थन करताना पक्षाला फेरविचार करण्याची मागणी केलीय.Body:बाबासाहेब यांच्या विचारधारेतून बहुजन समाज पक्ष उभा राहिला पण त्याच घराण्यातील व्यक्तीच्या विरोधात बसपा उमेदवार देत असतील तर ते योग्य होणार नाही. आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवारी देऊ नये, यासाठी प्रभारी महासचिव अ‍ॅड. संजीव सदाफुले यांना विनंती पत्र देणार असून, जर भूमिका बदली नाही तर मी पक्षाचा व प्रसंगी नगरसेवक पदाचा राजीनामा देईन,अशी आक्रमक भूमिका आनंद चंदनशिवे यांनी जाहीर केली आहे. दरम्यान, राहुल सरवदे यांनी बसपातर्फे सोलापूर लोकसभेसाठी मंगळवारी दुपारी अर्ज भरला.त्या पार्श्वभूमीवर चंदनशिवे यांनी आपला पवित्रा स्पष्ट केलाय.Conclusion:स्वतंत्र भारतातील पहिल्याच 1952 च्या निवडणुकीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. तेंव्हा बाबासाहेब आंबेडकर हे संसदेत जाऊ नये यासाठी काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार उभा करून त्यांचा पराभव केला होता. हा पराभव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी याचा विचार करावा,अन्यथा आंबेडकर या नावाच्या विरोधात जाणे आपणांस तरी शक्य नाही. पक्षाने दबाव वाढविल्यास आपण आपल्या सहकारी चार नगरसेवकांसह पक्षाचा राजीनामा देऊ असा इशाराही चंदनशिवे यांनी स्वतःच्या पक्षाला दिलाय.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.