ETV Bharat / state

Ashadhi Wari २०२१ : आषाढीसाठी पंढरीत आज संतांच्या पादुका भेट - बस

आषाढी सोहळ्यासाठी मानाच्या दहा संतांच्या पालख्या पंढरपुरात येणार आहेत. या पालख्या सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वाखरी तळ येथे येऊन विसावणार आहेत.

Ashadhi Ekadhashi Pandharpur Wari 2021 Update
Ashadhi Wari २०२१ : आषाढीसाठी पंढरीत आज संतांच्या पादुका भेट
author img

By

Published : Jul 19, 2021, 2:08 AM IST

पंढरपूर - आषाढी सोहळ्यासाठी मानाच्या दहा संतांच्या पालख्या पंढरपुरात येणार आहेत. या पालख्या सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वाखरी तळ येथे येऊन विसावणार आहेत. सर्व मानाचे संत प्रातिनिधिक स्वरूपात चालत पंढरपुरात येतील. तर मंगळवारी आषाढी एकादशीचा सोहळा रंगणार आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी आषाढीचा सोहळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा होत आहे. पंढरपुरात यंदाच्या वारीसाठी लाखो वारकरी नसतील. हरिनामाचा गजर नसेल. टाळ-मृदुंगाचा नादही यावेळी नसणार आहे. पण केवळ चारशे प्रातिनिधिक स्वरूपातील वारकऱ्यांच्या उपस्थित एकादशीचा सोहळा रंगणार आहे. प्रत्येक संतांच्या पालखी समवेत 40 वारकऱ्यांना पंढरीत प्रवेशाची मुभा देण्यात आली आहे. तर पंढरपूर शहरासह इतर दहा गावात संचारबंदी असल्याने येथे एकाही विठ्ठल भक्तास आणि वारकऱ्यास पंढरपुरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे शासनाकडून यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे.

वाखरी येथे संत भेटीचा सोहळा
वाखरी येथे सोमवारी सायंकाळी संत भेटीचा सोहळा होईल आणि त्यानंतर इसबावी नजीक असणाऱ्या विसावा मंदिरापर्यंत सर्व संतांच्या पादुका या वारकऱ्यांच्या समवेत चालत येतील. विसावा मंदिरापासून पुढे, पंढरपूर शहरातून मंदिरापर्यंत केवळ प्रातिनिधिक दोन वारकरी संतांच्या पादुका हातात घेऊन चालतील. तर उर्वरित 38 वारकरी हे आलेल्या एसटी बस मधूनच पादुका मंदिरापर्यंतचा प्रवास करतील. संतांच्या पादुका सोमवारी पंढरपुरातील पादुका मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमेपर्यंत अर्थात 24 जुलै पर्यंत निवास करणार आहेत. मंगळवारी एकादशी दिवशी सकाळी सात वाजता सर्व संतांच्या पादुकांचे चंद्रभागा स्नान आणि नगर प्रदक्षिणा पूर्ण होईल.

हेही वाचा - Ashadhi wari २०२१ : विठुरायाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांसह ८ जणांना उपस्थित राहण्याची परवानगी

हेही वाचा - Pandharpur Wari 2021 : पंढरपुरात आजपासून संचारबंदीची, 2700 पोलीस तैनात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.