ETV Bharat / state

Pandharpur Bandh : संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा महासंघाच्यावतीने 'पंढरपूर बंद'ची हाक - अखिल भारतीय मराठा संघ पंढरपूर बंद

मराठा समाजाच्या ( Maratha Reservation ) विविध मागण्यांसाठी मुंबई येथे ( Aazad Maidan Mumbai ) खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने 28 फेब्रुवारी रोजी 'पंढरपूर बंद'ची ( Pandharpur Bandh ) हाक दिली आहे.

Pandharpur Bandh Latest Update
Pandharpur Bandh Latest Update
author img

By

Published : Feb 27, 2022, 5:19 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - मराठा समाजाच्या ( Maratha Reservation ) विविध मागण्यांसाठी मुंबई येथे ( Aazad Maidan Mumbai ) खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने 28 फेब्रुवारी रोजी 'पंढरपूर बंद'ची ( Pandharpur Bandh ) हाक दिली आहे. तरी सर्व व्यापाऱ्यांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे.

प्रतिक्रिया

'सरकारला जाग आणण्यासाठी पंढरपूर बंद' -

राज्य सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्या संदर्भात फसवणूक केली आहे. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबई येथील मैदानावर संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय मराठा संघाच्यावतीने सोमवारी पंढरपूर पूर्ण बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण व विविध मागण्या संदर्भात अनेक मराठी युवकांनी बलिदान दिले आहे. मात्र, तरीही राज्यातील कोणत्या राज्य सरकारने मराठ्याच्या समाजाच्या मागण्या मान्य केले नाही. राज्य सरकारने देऊ केलेल्या उपाययोजनांचा मराठा समाजाला कोणताही लाभ मिळाला नाही. या सरकारने फसवणूक केली आहे. यासंदर्भात सरकारला जाग आणण्यासाठी पंढरपूर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अर्जुन चव्हाण यांनी दिली आहे.

आजाद मैदान येथे संभाजीराजेंचे उपोषण -

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईतील आजाद मैदान येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. 17 जूनला राज्य सरकार सोबत चर्चा केली होती. पंधरा दिवसात राज्य सरकारकडील सर्व मागण्या मार्गी लावू, असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. मात्र, अद्यापही त्याच मागण्या घेऊन उपोषणाला बसावे लागत आहे, अशी खंत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली होती. उपोषण सुरू करण्याआधी छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषणस्थळी पत्रकारांशी संवाद साधत राज्य सरकारवर आपली नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा - Aditya Thackeray on Marathi Bhasha Diwas : 2024 ला दिल्ली सर करणारच; मराठी भाषा गौरव दिनी मंत्री आदित्य ठाकरेंचा निर्धार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.