ETV Bharat / state

होळकर विद्यापीठाची स्मार्ट विद्यापीठाकडे वाटचाल; १ कोटी २० लाख रुपये खर्चून उभारला अत्याधुनिक स्टुडिओ - अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात अत्याधुनिक स्टुडिओ

सोलापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी अत्याधुनिक शिक्षण घेण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे जात होते. मात्र, आता सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आता सोलापुरातच अत्याधुनिक शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा आता डिजिटल आणि स्मार्ट विद्यापीठ म्हणून लौकिक होत आहे.

सोलापूर विद्यापीठ
सोलापूर विद्यापीठ
author img

By

Published : Mar 28, 2021, 5:48 PM IST

Updated : Mar 28, 2021, 6:28 PM IST

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाने 1 कोटी 20 लाख रुपये खर्च करून राष्ट्रीय दर्जाचे असे भव्य दिव्य अद्ययावत टेलिव्हिजन आणि रेडिओ स्टेशन उभारण्यात आले आहे. हा प्रकल्प फक्त विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी असल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ रवींद्र चिंचोळकर यांनी दिली. पुणे, मुंबई आणि कोल्हापूर विद्यापीठात देखील असे अत्याधुनिक स्टुडिओ नाही. पण सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली आहे. स्मार्ट सिटी बरोबर सोलापूर विद्यापीठ देखील स्मार्ट होत आहे.

होळकर विद्यापीठाची स्मार्ट विद्यापीठाकडे वाटचाल
पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदासोलापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी अत्याधुनिक शिक्षण घेण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे जात होते. मात्र, आता सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आता सोलापुरातच अत्याधुनिक शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा आता डिजिटल आणि स्मार्ट विद्यापीठ म्हणून लौकिक होत आहे. आत्याधुनिक शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना वणवण भटकावे लागत होते. मात्र, आता ही भटकंती थांबली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही विद्यापीठात असे अद्ययावत स्टुडिओ नाही. मात्र, सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी अद्यावत असा स्टुडिओ उभारण्यात आला आहे.

सोलापूर विद्यापीठाच्या मेहनतीमुळे अत्याधुनिक स्टुडिओ-
हा स्टुडिओ उभारण्यासाठी अडीच महिन्याचा कालावधी लागला. यासाठी दिल्ली येथील टीमचा मोठा सहभाग लाभला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी या अत्याधुनिक स्टुडिओसाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. सामाजिक शास्त्रे संकुलाचे चेअरमन डॉ गौतम कांबळे यांनी यासाठी पाठिंबा दिला. तर प्रा. डॉ रवींद्र चिंचोळकर यांनी केलेल्या सततच्या पाठपुरवठ्यामुळे या अद्ययावत स्टुडिओची उभारणी केली आहे. एकंदरीत आता विद्यार्थ्यांना या स्टुडिओचा प्रात्यक्षिक करण्यासाठी भरपूर लाभ होणार आहे. तसेच टीव्ही आणि रेडिओ क्षेत्रात करिअर शोधणाऱ्या विद्यार्थ्यांना सोलापुरातच अनुभव मिळणार आहे.

कोरोना महामारीत स्टुडिओचा फायदा
कोरोना महामारीमुळे अनेक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठातील वर्ग बंद आहेत. पण या महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचे लेक्चर्स ऑनलाइन होत आहेत. ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी सोलापूर विद्यापीठाला या स्टुडिओचा भरपूर फायदा होत आहे. विद्यापीठातील प्राध्यापक या स्टुडिओचा वापर करून लेक्स्चर्स ऑडिओ आणि व्हिडीओ अशा दोन्ही स्वरूपात तयार करुन विद्यार्थ्यांना पाठवत आहेत.

Last Updated : Mar 28, 2021, 6:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.