सोलापूर - स्वातंत्रलढ्यात क्रांतिकारक म्हणून सावरकर मोठे आहेत. मात्र, त्यांच्या माफीनाम्यानंतर पत्री सरकारमधील ब्रिटिशांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्यांना पकडण्याचे काम हिंदू महासभा आणि सावकरांच्या संघटनेने केले. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार देणे चुकीचे आहे, असे वक्तव्य अॅ़ड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांना भाजप सरकार भारतरत्न देणार असल्याचे भाजप सरकारने म्हटले आहे. तोच धागा पकडून प्रकाश आंबेडकर गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोलापुरातील पार्क मैदानावर आयोजित सभेत बोलत होते.
हे वाचलं का? - भाजप-शिवसेनेचे हे 'रमण राघव' सरकार , राज ठाकरेंचा माहीम येथील प्रचारसभेत घणाघात
सावकरांच्या दोन बाजू आहेत. ते स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारक म्हणून योग्यच आहेत. ते सर्वांनी मान्य देखील केले. मात्र, त्यांचा दुसरा चेहरा देखील आहे. त्यावेळी सातारा, सांगलीमधील पत्री सरकारने ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांच्याविरोधात बंड पुकारले होते. मात्र, सावरकरांच्या संघटनेने त्या बंडखोरांना पकडून देण्याचे काम केले. एक क्रांतिकारक यातना सहन करून आल्यानंतर दुसऱ्या बंडखोरांना यातना भोगण्यासाठी पाठवतो, हे कितपत योग्य आहे? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हे वाचलं का? - रणधुमाळी विधानसभेची : मोदी आणि शाहांचे टार्गेट पवारचं का?
मोदी आणि शाह यांनी अंदमान निकोबारला भेट दिल्याचे आठवत नाही, असे देखील ते यावेळी म्हणाले. शिवाय त्यांनी सावरकर वाचलेले नाहीत. त्यामुळं त्यांना सावरकरांच्या योगदानाची दुसरी बाजू माहिती नाही असंही आंबेडकर यावेळी म्हणाले.