ETV Bharat / state

पंढरपुरात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, नातेवाईकांना पाठवले अश्लील व्हिडिओ

author img

By

Published : Apr 25, 2021, 10:59 PM IST

Updated : Apr 26, 2021, 1:51 PM IST

अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करून तिचे विवस्त्र फोटो नातेवाईकांना पाठवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. माढा तालुक्यातील कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

File photo
File photo

पंढरपूर (सोलापूर) - अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करून तिचे विवस्त्र फोटो नातेवाईकांना पाठवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. माढा तालुक्यातील कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माढा तालुक्यातील एका गावामध्ये पीडित तरुणी राहते. सदर तरुणी शिक्षण घेत असताना तिची ओळख सचिन रकिबे याच्यासोबत झाली. त्यानंतर त्या ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये झाले. 2017 पासून लग्नाचे आमिष दाखवून सचिनने तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबरदस्तीने अत्याचार केले. मात्र सचिनने त्यावेळी तरुणीला माहीत न करता विवस्त्र अवस्थेत फोटो व व्हिडीओ काढले. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याची जाणीव तिला झाली. त्यानंतर तिने सचिनला नकार दिला. या रागातून त्यानंतर सचिनने तरुणीची अश्लील व्हिडिओ व फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून नातेवाईकांना पाठवले.

पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

सदर पीडित तरुणीला नातेवाइकांकडून हा प्रकार समजतात तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तरुणाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बदनामी, बालकांचे लैंगिक अत्याचार व अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे करीत आहेत.

Last Updated : Apr 26, 2021, 1:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.