सोलापूर - बार्शी शहरापासून जवळ असलेल्या शेलगाव (होळे) येथे एका गाडीने तरूणाला चिरडले. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून ज्या गाडीने तरुणाला चिरडले आहे. ती गाडी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांची असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. ही गाडी पूतण्याची असल्याचे तानाजी सांवत यांनी सांगितले आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने अपघात झालेली गाडी फोडली.
बार्शी शहरापासून जवळ असलेल्या शेलगाव (होळे) चौकात सकाळी आठच्या सूमारास अपघात झाला. फॉरच्यूनर गाडीने एकाला चिरडले. शाम होळे या तरुणाचा यामध्ये मृत्यू झाला. अपघातात शाम होळे यांचा मृत्यू झाल्याचे कळल्यावर संतत्प झालेल्या जमावाने गाडी फोडली. ज्या गाडीने अपघात झाला ती गाडी राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांची असून त्याच्यांवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली. मात्र, ज्या गाडीने अपघात झाला त्या गाडीत पूतण्या असल्याचे तानाजी सांवत यांनी सांगितले.
तानाजी सावंत यांच्या कुटूंबातील असलेल्या गाडीने अपघात झाल्यामुळे सुरुवातीला या घटनेच्या बाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही. उलट माहिती दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर मृतदेह हा बार्शीला नेण्यात आला आहे. या घटनेनंतर काही काळ रस्त्यावर तणावाचे वातावरण होते.