ETV Bharat / state

विठ्ठलाच्या चरणावरील हार आता भाविकांच्या गळ्यात, मंदिर समितीकडून अनोखा उपक्रम

विठ्ठलाच्या चरणी अर्पण होणारे तुळशी, फुलांच्या हार आता भाविकांच्याच गळ्यात घातला जाणार आहे. मंदिर समितीच्या या निर्णयाने भाविकांनी आनंद व्यक्त केला जात आहे.

author img

By

Published : Dec 21, 2019, 5:04 AM IST

Updated : Dec 21, 2019, 8:15 AM IST

विठ्ठलाच्या चरणावरील हार भाविकांच्या गळ्यात

सोलापूर - पंढरीच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता आगळा वेगळा प्रसाद मिळणार आहे. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्या भाविकाला आता विठ्ठलाच्या चरणावरील हार हा प्रसाद म्हणून गळ्यात घातला जाणार आहे.

विठ्ठलाच्या चरणावरील हार आता भाविकांच्या गळ्यात, मंदिर समितीकडून अनोखा उपक्रम

दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्य व परराज्यातून लाखो भाविक येतात. देह भान विसरून शेकडो मैल पायी वारी करत येणाऱ्या वारकऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरात असते. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेले भाविक देवाला अर्पण करण्यासाठी विविध प्रकारच्या फुलांचे हार घेतात. तर आता श्री विठ्ठलाला अर्पण केलेला हार भाविकांच्या गळ्यात घालण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा - पंढरपुरातील भाविकांचे मोबाईल लंपास करणारे तिघे अटकेत, 55 मोबाईल जप्त

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी रोज हजारो तुळशी, झेंडूच्या फुलांचे हार अर्पण होतात. दररोज सुमारे 500 ते 600 किलो हारांचा ढिग जमा होतो. जमा केलेले हाराची मंदिर समितीचे कर्मचारी ट्रॅक्टरच्या सहाय्याने घेऊन यमाईचे तलाव येथील गोशाळेजवळ विल्हेवाट लावावी लागत होती. यासाठी मंदिर समितीला विशिष्ट यंत्रणा राबवावी लागत होती.

श्री विठ्ठलाला भाविकांनी अर्पण करण्यासाठी आणलेला हार भाविकांच्या गळ्यात घातल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद व प्रसन्नता दिसत आहे. तर भाविक मोठ्या श्रध्देने देवाचा हार आपल्या घरी घेऊन जाणार असल्याचे सांगत होते. तसेच विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकामधून मंदिर समितीने घेतलेल्या या निर्णयावर समाधान व्यक्त करत होते.

हेही वाचा - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सोलापुरात मुस्लीम बांधवांचा मोर्चा

Intro:mh_sol_01_vitthal_har_7201168
भक्तांना मिळणार आता विठ्ठलाचा आगळावेगळा प्रसाद
श्री विठ्ठलाच्या चरणावरील हार आता भाविकांच्या गळ्यात..!
सोलापूर-
पंढरीच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता आगळा वेगळा प्रसाद मिळणार आहे. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर आणि याची देही याची डोळा विठ्ठलाची सावळी मूर्ती डोळ्यात साठविल्यानंतर त्या भाविकाला आता विठ्ठलाच्या चरणावरील हार हा प्रसाद म्हणून गळ्यात घातला जाणार आहे.Body:श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्य व परराज्यातून लाखो भाविक पंढरपूरात येतात. देह भान विसरून शेकडो मैल चालत पायी वारी करत येणाऱ्यां वारकऱ्यांची संख्या देखील लाखोंच्या घरातच असते. राज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी पंढरपूर मध्ये येत असतात.श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेले भाविक देवाला अर्पण करण्यासाठी विविध प्रकारच्या फुलांचे हार घेतात.तर आता श्री विठ्ठलाला अर्पण केलेला हार भाविकांच्या गळ्यात घालण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे प्रांताधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी रोज हजारो तुळशी,झेंडूच्या फुलांचे हार अर्पण होतात.दर महिन्याला ५०० टनाच्या आसपास हारांचा  ढिग जमा होतो.जमा केलेले हार मंदिर समितीचे कर्मचारी ट्रॅक्टरच्या सहाय्याने घेऊन यमाईचे तलाव येथील गोशाळे जवळ विल्हेवाट लावावी लागत होती.यासाठी मंदिर समितीला विशिष्ट यंत्रणा राबवावी लागत होती.

श्री विठ्ठलाला भाविकांनी अर्पण करण्यासाठी आणलेला हार भाविकांच्या गळ्यात घातल्यानंतर भाविकांच्या चेहर्यांवर आनंद व प्रसन्नता दिसत होती.तर भाविक मोठ्या श्रध्देने देवाचा हार आपल्या घरी घेऊन जाणार असल्याचे सांगत होते.तसेच विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकामधून मदिर समितीने घेतलेल्या या निर्णयावर समाधान व्यक्त करत होते.Conclusion:
Last Updated : Dec 21, 2019, 8:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.