ETV Bharat / state

सासरच्या जाचाला कंटाळून गरोदर महिलेची आत्महत्या; सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल - solapur crime news

करकंब येथील जळोली परिसरात राहणारी विद्या हिचा 2 वर्षांपूर्वी रणजीत गोड याच्यासोबत विवाह झाला होता. गेल्या काही दिवसांपासून सासरची मंडळी तिला घरकामा करण्यावरु, घरुन पैसे आणण्यावरुन त्रास देत होते. या त्रासाला कंटाळुन तिने आत्महत्या केली.

a married women commited suicide in pandharpur
सासरच्या जाचाला कंटाळून गरोदर महिलेची आत्महत्या; सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल
author img

By

Published : Sep 4, 2020, 11:03 AM IST

सोलापूर - सासरच्या जाचाला कंटाळून एका 19 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे घडली आहे. याप्रकरणी, महिलेच्या पतीसह, सासू, सासरे, पतीच्या भावाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विद्या रणजीत गोड असे मृत विवाहितेचे नाव आहे.

करकंब येथील जळोली परिसरात राहणारी विद्या हिचा 2 वर्षांपूर्वी रणजीत गोड याच्यासोबत विवाह झाला होता. ती चार महिन्याची गरोदर होती. गेल्या काही दिवसांपासून सासरची मंडळी विद्याला घरकाम करण्यावरून टोमणे मारून त्रास देत होते. तर, तिच्या कुटुंबाकडून पैशांची मागणी करत होते. अखेर सासरच्या जाचाला कंटाळून विद्याने तिच्या राहत्या घरात बुधवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. तर, विद्याचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला.

या प्रकरणी विद्याचे वडील औदुंबर मारुती बेडगे यांनी फिर्याद दाखल केल्यानतंर पोलिसांनी विद्याचा पती रणजीत गोड, सासू शांताबाई गोड, दिर विश्वजीत गोड, सासरा अंकुश गोड यांच्याविरोधात कारक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत पाटील अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.