ETV Bharat / state

माढ्यातील 92 वर्षीय आजीची कोरोनावर मात; बाधित सुनेलाही दिला धीर - Corona treatment

माढ्यातील ९२ वर्षीय मुक्ताबाई ठाकुजी जानराव या आजीबाईंनी मोठ्या धैर्याने कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनाने काहीही होत नाही, उपचाराने तो बरा होतो, असा धीर देणारा संदेशही त्यांनी इतरांना दिला आहे.

माढ्यातील 92 वर्षीय आजीची कोरोनावर मात
माढ्यातील 92 वर्षीय आजीची कोरोनावर मात
author img

By

Published : May 5, 2021, 11:33 AM IST

माढा (सोलापूर)- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. तसेच कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही आता वाढू लागली आहे. त्याचप्रमाणे माढ्यातील ९२ वर्षीय मुक्ताबाई ठाकुजी जानराव या आजीबाईंनी मोठ्या धैर्याने कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनाने काहीही होत नाही, उपचाराने तो बरा होतो, असा धीर देणारा संदेशही त्यांनी इतरांना दिला आहे.

मुक्ताबाई यांना कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्याने त्यांचा मुलगा अशोक जानराव यांनी त्यांची कोरोना चाचणी केली. यात त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. मात्र मुक्ताबाई कसल्याही डगमगल्या नाहीत.
माढ्यातील मित्रप्रेम रुग्णालयाचे डाॅ.विकास मस्के यांनी त्यांच्यावर उपचार केले. विविध वैद्यकीय चाचण्यासह केलेल्या औषध उपचाराला मुक्ताबाईच्या शरीराची साथही मिळाली. त्यामुळे प्रतिकार शक्ती अन् जिद्दीच्या बळावर त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

मुक्ताबाईच्या स्नुषाही कोरोनाबाधित-

पुढे मुक्ताबाई यांच्या सुनबाई शोभा जानराव या देखील कोरोनाबाधित निघाल्या. सुन बाईलादेखील मुक्ताबाई यांनी न घाबरता उपचार घे काही होणार नाही, असा धीर दिला. त्यांनी देखील कोरोनावर मात केलीय.

पहिल्या स्टेजलाच निदान करून घ्या

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.
कोरोनाबाधित रुग्णांनी भीती न बाळगता उपचार घ्यावेत, मी पाॅझिटिव्ह निघलो तर माझे कसे होणार? लोक, समाज काय म्हणेल? असे विचार देखील डोक्यात आणु नका. पहिल्या स्टेजलाच निदान घ्यावे. मुक्ताबाई या आजी जिद्द आणी प्रतिकार शक्तीमुळे कोरोनाला हरवू शकल्या. त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे, अशी प्रतिक्रिया माढ्यातील मित्रप्रेम रुग्णालयाचे डाॅ.विकास मस्के यांनी दिलीय.

कोरोनाच्या नियमांचे पालन करा

मला कुठे कोरोना होतोय. या अति आत्मविश्वासात न बसता प्रत्यकाने
कोरोनाच्या नियमाचे पालन करायला हवे.
पाॅझिटिव्ह निघलोय माझ आता कसं होणार असे संकुचित विचार घेऊन कोणीही घाबरु नका. प्रत्येकाने मास्क आणि सोशल डिस्टन्स ठेवायला हवा, असा सल्ला ९२ वर्षीय मुक्ताबाई जानराव यांनी दिलाय.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.