पंढरपूर (सोलापूर) - महाविकास आघाडी सरकारसह भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे शनिवारी 66.15 टक्के टक्के मतदान झाले आहे पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके व भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्यात प्रमुख लढत असणार आहे. अपक्ष उमेदवार शैला गोडसे, स्वाभिमानीचे सचिन पाटील यांचे भविष्य मतदान पेटीत बंद झाले.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाची बनलेली पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 66.15 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 7 ते 7 सायंकाळी सात वाजेपर्यंत चाललेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सव्वादोन लाख मतदारांनी सहभाग नोंदविला. त्यात पुरुषांची मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर होती. तर स्त्रियांनी अल्पशा प्रमाणात सहभाग घेतला. चुरशीच्या झालेल्या या पोटनिवडणुकीत प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनाही करण्यात आले होते.
हेही वाचा-महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या, आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी
प्रस्थापित उमेदवारांचे भविष्य मतदान पेटीत बंद
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महामारीच्या काळातही प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवला होता. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवारपासून ते विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवस यांनी सारी ताकद पणाला लावली आहे. राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके तर भाजप समाधान आवताडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. यांच्याबरोबरीने अपक्ष उमेदवार शैला गोडसे, स्वाभिमानचे सचिन पाटील, अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे हे आपले नशीब आजमावत आहेत. या उमेदवारांचे भविष्य शनिवारी मतदारांनी मतदान करून मतपेटीत बंद केले आहे.
हेही वाचा-नागपुरात 6 हजार 959 नवे कोरोनाबाधित; 79 जणांचा मृत्यू
2 मे रोजी पोटनिवडणुकीचा निकाल-
आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. 30 मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्याला चार एप्रिलपासून प्रस्थापित पक्षाच्या नेत्यांकडून प्रचाराचा धुरळा उडविण्यात आला. या निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे.