पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात पोलीस प्रशासनाची धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यातील रांझणी येथे अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या दोघा जणांला अटक करण्यात आली. कारवाईमध्ये दोन लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे संकेत विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिले आहेत.
हेही वाचा-नागपूर: 'माझ्याकडे रागाने का पाहतो' म्हणत गुंडांनी दोन तरुणांना चाकूने भोसकले!
3330 देशी दारूच्या बाटल्या जप्त
सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी अवैध धंद्याविरोधात कारवाईचा बडगा उघडला आहे. त्याबाबत आदेशही पोलीस प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील अवैध धंदा करणाऱ्या विरोधात पोलीस प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. त्यातीलच तालुक्यातील रांझणी येथील जगदंबा हॉटेलमध्ये अवैधरित्या देशी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे विभागीय पोलीस पथकाने छापा टाकला. त्या ठिकाणी 3,330 देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहात.
दोघा जणांना अटक
रांझणी येथील जगदंबा हॉटे मध्ये अवैधरित्या देशी दारू साठा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता हॉटेल मालकाच्या घरी देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. दोन लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रकरणी प्रदीप बाळासाहेब आवताडे व नागेश ढोणे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.