ETV Bharat / state

सांगोला : वीज पडून 16 शेळ्यामेंढ्या दगावल्या - Sangola goats and sheep killed news

चिंचोली येथे वीज पडून एकाच वेळी 16 शेळ्यामेंढ्या जागेवरच दगावल्या आहेत. वाघमोडे वस्ती येथे शनिवारी ही घटना घडली.

सांगोला न्यूज
सांगोला : वीज पडून 16 शेळ्यामेंढ्या दगावल्या
author img

By

Published : May 30, 2021, 4:13 PM IST

पंढरपूर - सांगोला तालुक्यातील चिंचोली येथे वीज पडून एकाच वेळी 16 शेळ्यामेंढ्या जागेवरच दगावल्या आहेत. वाघमोडे वस्ती येथे शनिवारी ही धक्कादायक घटना घडली. चिंचोली येथील मेंढपाळ शिवाजी गडदे यांच्या लहान मोठ्या 16 शेळ्यामेंढ्या दगावल्यामुळे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

वीज पडून 16 शेळ्या-मेंढ्या जागीच ठार
सांगोला तालुक्यातील चिंचोली येथे मेंढपाळ शिवाजी गडदे हे शेतीचे शेळ्या-मेंढ्याच्या व्यवसाय करतात. मेंढपाळ गडदे हे नेहमीप्रमाणे मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. या परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. संध्याकाळच्या सुमारास मारास काळेकुट्ट ढग दाटून आले होते. तितक्यात जोरात विजेचा कडकडाट झाला. गडदे यांनी शेळ्यामेंढ्या कडग्यात आणून सोडल्या होत्या. मात्र विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्यानंतर शेळ्यामेंढ्याच्या अंगावर जोरदार वीज पडली. यात लहान मोठ्या 16 शेळ्या मेंढ्या जागीच ठार झाल्या. गावचे तलाठी विकास काळे यांनी पंचनामा केला आहे.

सोलापूर जिल्ह्यात 66 मिमी पावसाची नोंद
सोलापूर जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा तालुक्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी रिपरिप पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे काही दिवसापासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाल्याचे चित्रही दिसून आले तर शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील मशागतीच्या कामाची जोराने सुरुवात झाली आहे. पंढरपूर तालुक्यात पट कुरोली 6 मिमी, भंडीशेगाव 16 मिमी, कासेगाव 5 मिमी, पंढरपूर 34 मिमी, तुंगत 5 मिमी नोंद करत सरासरी पाऊस 7.33 मि.मी पाऊस पडला आहे तर सोलापूर जिल्ह्यात 66 मिमीची नोंद करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.