ETV Bharat / state

वेंगुर्ले येथे भरलायं कोकणातील रान भाज्यांचा उत्सव - वेंगुर्ला रानभाज्या उत्सव न्यूज

पावसाळ्यामध्ये कोकणात विविध रानभाज्या उगवतात. मात्र, अनेकांना या रानभाज्यांची ओळखच नाही. रानभाज्यांचे औषधी महत्व, उपयोग आणि त्यापासून बनवता येणाऱ्या चवदार पाककृती यांची माहिती युवा पिढीला होण्यासाठी 'माझा वेंगुर्ला'तर्फे रानभाज्या उत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Wild Vegetables
रानभाज्या
author img

By

Published : Jul 19, 2020, 6:12 PM IST

सिंधुदुर्ग - पावसाच्या आगमनासोबत कोकणच्या रानावनात उगवणाऱ्या अनेक दुर्मिळ, औषधी आणि रानमोळी चवदार रानभाज्यांची खवय्यांना उत्सुकता असते. मात्र, अनेकांना या रानभाज्यांची ओळखच नाही. रानभाज्यांचे औषधी महत्व, उपयोग आणि त्यापासून बनवता येणाऱ्या चवदार पाककृती यांची माहिती युवा पिढीला होण्यासाठी 'माझा वेंगुर्ला'तर्फे रानभाज्या उत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

वेंगुर्ला येथे रानभाज्यांचा उत्सव भरला आहे

हा उत्सव आणि विक्री केंद्र वेंगुर्ला नगरपरिषदेसमोर सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी उपलब्धतेनुसार ग्राहकांना रानभाज्या दिल्या जातात. पावसाळ्यामध्ये कोकणात रानभाज्या हा खाद्य संस्कृतीतील महत्त्वाचा घटक आहे. भारंगी, कुरडू, टाकळा, सुरण, अळू, चक्रमुनी, पेवगा, दिंडा, निवडुंग, केना, काठेमान, भुईआवळा, तोंडली, तांदूळजा, शतावरी, आंबाडा, फागला, आघाडा, एकपान, घोटवेल, अळंबी, मायाळू अशा विविध प्रकारच्या भाज्या कोकणात प्रसिद्ध आहेत.

सुरणाच्या पाल्याची वडी, टाकळ्याची भजी, आयुर्वेदिक चहा, वडीच्या पानाची भजी, ओव्याची भजी, टाकळयाचे थालीपीठ, भुई आवळ्याचे सुप, अळूवड्या, भारंगीची कचोरी, पेव्याचे कटलेट असे काही पदार्थ कोकणी लोकांच्या जेवणात मिळतात. त्यामुळे वेंगुर्ले येथे भरलेल्या या रानभाज्या उत्सवात खवय्ये आपल्या आवडीची भाजी खरेदी करण्यासाठी आणि तयार पदार्थ घाण्यासाठी येत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.