ETV Bharat / state

कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ सिंधुदुर्गात ७ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा

कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने ७ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात सुमारे १० हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. हा मोर्चा मुडेडोंगरी येथून नरडवे रोडवरून प्रांत कार्यालयापर्यंत काढला जाणार आहे.

MLA Nitesh Rane News
आमदार नितेश राणे
author img

By

Published : Jan 6, 2021, 5:24 PM IST

सिंधुदुर्ग - कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने ७ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात सुमारे १० हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. हा मोर्चा मुडेडोंगरी येथून नरडवे रोडवरून प्रांत कार्यालयापर्यंत काढला जाणार आहे. त्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल भोंडे, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण सहभागी होणार आहेत. अशी माहिती भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माहिती देताना आमदार नितेश राणे

हेही वाचा - परवाना कर : व्यापारी महासंघाने घेतली महापालिका आयुक्तांची भेट

मोर्चात शेतकऱ्यांना स्वतःहून सहभागी व्हायचे आहे. ७ जानेवारीला कणकवलीत काढल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर मोर्चाची माहिती देण्यासाठी भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रहार भवन येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणालेत, या मोर्चात शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे आहे, असे शेतकरी स्वतःहून सांगत आहेत. मोर्चाबाबत आम्हाला शेतकऱ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कोकणातील शेतकऱ्यांचा कृषी कायद्यांमुळे फायदा होत आहे. या मोर्चामुळे कोकणात, महाराष्ट्रात आणि देशात चांगला संदेश जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे हे कायदे केले आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे.

कोकणातील शेतकऱ्यांचा या कृषी कायद्यामुळे फायदा

आपल्या शेतात उत्पादित होणारा आंबा, काजू, सुपारी, भात किंवा इतर कृषी उत्पादने विक्रीसाठी कृषी उत्पन्न समिती हा एकच पर्याय आज पर्यंत आम्हा शेतकऱ्यांकडे होता. मात्र, आता या नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी आपला आंबा बिगबाजार, डिमार्ट, मेरा किसान अशा कोणत्याही ठिकाणी विक्री करू शकतो. म्हणजेच, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इतर मार्केट असे चांगले पर्याय या कायद्यामुळे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. त्यामुळे, कोकणातील शेतकऱ्यांना या कृषी कायद्यांचा सर्वात जास्त फायदा होणार आहे, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होणार नाही

हे नवीन कायदे शेतकऱ्याला बाजरपेठ उपलब्ध करून देतात. देवगडचा आंबा बिग बाजारमध्ये किंवा दोडामार्ग काजू गुजरातमध्ये विकला जाईल तेव्हा शेतकऱ्यालाच फायदा होईल. या मुळे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होणार नाही. मात्र, या कांद्याला काँग्रेस पक्ष टोकाचा विरोध करत आहेत. जर राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाले आणि वायनाड मधून निवडून येऊ शकतात, तर देवगडचा हापूस आंबा मध्यप्रदेशात का विकला जाणार नाही? असा सवाल करत आमदार नितेश राणे यांनी ट्रॅक्टर मोर्चातून शेतकऱ्यांचा पाठिंबा दाखवून देऊ, असे सांगितले.

देशाला महासत्तेकडे नेणारे, सामान्य शेतकऱ्याला ताकद देणारे तीन कृषी विषयक विधेयके (कायदे) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंजूर केले. या कायद्यांना माझ्या कणकवली-देवगड, वैभववाडी मतदारसंघातील शेतकरी आणि जनतेचा किती मोठा पाठिंबा आहे, हे या ट्रॅक्टर मोर्चातून दाखवून देवू. आणि विधेयकाचा जयजय करू. त्यासाठी हा मोर्चा असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

हेही वाचा - अत्याचार करणारा राष्ट्रवादीचा नेताच, पीडित महिलेचा पुनरुच्चार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.