ETV Bharat / state

नितेश राणेंना भाजपच्या दुसऱ्या यादीत मिळणार स्थान?

नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना पक्षप्रवेश न देताच एबी फॉर्म देण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, 'फक्त काही तास बाकी; वादळा पूर्वीची शांतता' असे सूचक ट्वीट नितेश राणे यांनी केल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.

नितेश राणे
author img

By

Published : Oct 2, 2019, 10:07 AM IST

कणकवली - नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना पक्षप्रवेश न देताच एबी फॉर्म देण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

नितेश राणे 4 ऑक्टोबरला कणकवली-देवगड मतदार संघातून उमेद्वारी अर्ज भरणार आहेत. भाजपच्या दुसऱ्या यादीत नितेश यांचा समावेश असल्याचे समजते. विशेष म्हणजे भाजपमध्ये प्रवेश न करताच नितेश राणे यांचे नाव थेट उमेदवारी यादीत दिसणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा MAHA VIDHAN SABHA : राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली निवडणूक.. मुद्रांक घोटाळा अन् पहिला दलित मुख्यमंत्री

मंगळावारी रात्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी उमेदवारी मिळण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, 'फक्त काही तास बाकी; वादळा पूर्वीची शांतता' असं सूचक ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे. त्यामुळे तूर्तास नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होणार नसला, तरीही नितेश राणेंची भाजप मध्ये एन्ट्री होणार हे जवळपास नक्की आहे.

Intro:
कणकवली: नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांना भाजप प्रवेश न देताच एबी फॉर्म देण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. नितेश राणे ४ ऑक्टोबरला कणकवली- देवगड मतदार संघातून आपला उमेद्वारी अर्ज भरणार आहेत. भाजपच्या दुसऱ्या यादीत नितेश यांचा समावेश असल्याचे समजते. विशेष म्हणजे भाजपमध्ये प्रवेश न करताच नितेश राणे यांचं नाव थेट उमेदवारी यादी दिसणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मंगळावारी रात्री नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा निर्णय झाला असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान 'फक्त काही तास बाकी, वादळा पूर्वीची शांतता' असं सूचक ट्वीट नितेश राणे यांच्याकडून करण्यात आले आहे. त्यामुळे तूर्तास राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होणार नसला. तरी नितेश राणेंची भाजप मध्ये इन्ट्री होणार हे जवळपास नक्की आहे. Body:https://twitter.com/NiteshNRane/status/1179088060836790273?s=19Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.