ETV Bharat / state

गेल्या दोन दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस, काही गावांचा संपर्क तुटला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी तर पुलावरून पाणी वाहत असल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता.

For the last 2 days Heavy rain in sindhudurag district
गेल्या 2 दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस
author img

By

Published : Jun 17, 2020, 5:23 PM IST

Updated : Jun 17, 2020, 6:41 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी तर पुलावरून पाणी वाहत असल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता. 1 जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 766.45 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

मान्सूनच्या आगमनानंतर दोन दिवस पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. परंतु, सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात हा पाऊस कोसळत आहे.

गेल्या दोन दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस, काही गावांचा संपर्क तुटला
गेल्या 24 तासात सांवतवाडी 117 मिलीमीटर, वैभववाडी 136 मिलीमीटर, कुडाळ 55 मिलीमीटर, वेंगुर्ला 110 मिलीमीटर, कणकवली 108 मिलीमीटर, दोडामार्ग 105 मिलीमीटर, देवगड 80 मिलीमीटर, मालवणमध्ये 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. सांवतवाडी आणि वैभववाडी तालुक्यात तर पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे.अनेक भागातील नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. माणगाव खोऱ्यात जाणाऱ्या मार्गावरील नदीला पूर आल्याने येथील पूल काहीकाळ पाण्याखाली गेले होते. शेतमळ्यांमधून पाणी ओसंडून वाहत आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असून, शेतीच्या कामांना जोरदार सुरूवात झाली आहे.

Last Updated : Jun 17, 2020, 6:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.