ETV Bharat / state

Castro Coral Snake Video : सिंधुदुर्गात आढळला अतिदुर्मिळ कॅस्ट्रो कोरल स्नेक - Rare Snake Find News

पश्चिम घाटामध्ये सिंधुदुर्गची जैवविविधता ही अतिशय श्रीमंत समजली जाते आणि याच श्रीमंतीची अनेक उदाहरणे आपल्यासमोर नेहमी आपण बघत आलो आहोत. वेंगुर्ला तुळस राऊळवाडा येथील महेश राऊळ यांना कॅस्ट्रो कोरल स्नेक ( Castro Coral Snake ) ज्याला मराठीमध्ये पोवळा साप ( Povla Snake ) असे म्हटले जाते ही अतिशय दुर्मिळ सापाची प्रजाती ( Very rare snake species ) आढळून आली आहे.

Castro Coral Snake
कॅस्ट्रो कोरल स्नेक
author img

By

Published : Nov 24, 2021, 2:55 PM IST

Updated : Nov 24, 2021, 3:15 PM IST

सिंधुदुर्ग - वेंगुर्ला तुळस राऊळवाडा येथील महेश राऊळ यांना कॅस्ट्रो कोरल स्नेक ( Castro Coral Snake ) ज्याला मराठीमध्ये पोवळा साप ( Povla Snake ) असे म्हटले जाते ही अतिशय दुर्मिळ सापाची प्रजाती ( Very rare snake species ) आढळून आली आहे. सिंधुदुर्गमध्ये केवळ दुसऱ्यांदा या सापाची नोंद झाली असल्याचे वन्य प्राणी अभ्यासक हेमंत ओगले ( Wildlife researcher Hemant Ogle ) यांनी सांगितले आहे.

अतिदुर्मिळ कॅस्ट्रो कोरल स्नेक

दुर्मिळ सापाची प्रजाती आढळली -

पश्चिम घाटामध्ये सिंधुदुर्गची जैवविविधता ही अतिशय श्रीमंत समजली जाते आणि याच श्रीमंतीची अनेक उदाहरणे आपल्यासमोर नेहमी आपण बघत आलो आहोत. अलिकडेच आढळलेला काळा बिबटा असेल किंवा पट्टेरी वाघांचे अस्तित्व असेल त्यात भर म्हणून वेंगुर्ले तालुक्यातील तुळस राऊळवाडा येथील प्राणीमित्र महेश राऊळ ( Animal friend Mahesh Raul ) यांना कॅस्ट्रो कोरल स्नेक ज्याला मराठीमध्ये पोवळा साप असे म्हटले जाते ही अतिशय दुर्मिळ सापाची प्रजाती आढळून आली आहे.

सिंधुदुर्गात केवळ दुसऱ्यांदा या सापाची झाली नोंद -

महेश राऊळ हे गेली अनेक वर्ष भरवस्तीत आलेले साप पकडुन जंगलात सोडतात ते परिसरामध्ये सर्पमित्र म्हणून सुपरिचित आहेत. त्याशिवाय भटके प्राणी असतील किंवा वन्यप्राणी जखमी प्राणी यांच्यावर उपचार करण्यासाठी सुद्धा महेश राऊळ नेहमी अग्रस्थानी असतात. असेच काम करत असताना त्यांना घराच्या शेजारी हा साप आढळून आला. त्यांनी तत्काळ आपले सहकारी वैभव अमृसकर आणि कोकण वाइल्डलाइफ रेस्क्यू फोरमचे अध्यक्ष अनिल गावडे यांना संपर्क केला. या तिघांनी शहानिशा केल्यानंतर त्यांना लक्षात आले की हा साप संपूर्ण पश्चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ असून अतिशय दुर्मिळ असा आहे हा साप पाहण्यासाठी सर्पमित्र भटकत असतात किंवा हा साप दिसावा म्हणून संशोधनही केले जाते. सिंधुदुर्गमध्ये केवळ दुसऱ्यांदा या सापाची नोंद झाली असल्याचे वन्यप्राणी अभ्यासक हेमंत ओगले यांनी सांगितले आहे. हेमंत ओगले यांनी या सापाचे संशोधन केले आहे.

अत्यंत विषारी साप -

विषारी प्रजातीमध्ये मोडला जाणार हा साप फारसा दृष्टीस पडत नाही. वरून बघितल्यानंतर मन्यार सारखा दिसणारा हा साप पोटा खालून पूर्णपणे भगवा असतो. त्याचा हा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचे द्योतक मानले जाते. दगडा खाली आणि पालापाचोळ्याखाली हा साप नेहमी राहतो. त्याचे भक्ष छोटे बेडूक सरडे पाली गांडूळ इत्यादी आहे. साधारणपणे दोन ते अडीच फुटापर्यंत या सापाची लांबी असते. तो करंगळी एवढा जाड असतो. ह्याच्या बरोबर डोक्यावरती भगवी जाड रेषा असते. जर हा साप घाबरला तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून आपल्या जवळ येऊ नका असा इशारा देत असतो.

सर्पमित्र लिहिणार शोधनिबंध -

हा साप महेश राऊळ यांना आढळल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मानद वन्यजीव रक्षक काका भिसे यांच्याशीही संपर्क केला व या सापा विषयी माहिती घेतली. महेश राऊळ, अनिल गावडे व वैभव अमृतकर यांनी या सापाचे नोंद त्यांच्या रजिस्टरमध्ये केली असून लवकरच या सापाच्या अधिवासाबद्दल व सापाच्या आढळाबाबत छोटेखानी शोधनिबंध लिहिणार असल्याचे सांगितले आहे. या सापाच्या आढळामुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याची जैवविविधता जगाच्या समोर प्रकाशझोतात येणार असून येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा जैवविविधता दृष्ट्या जगाच्या नकाशावर झळकणार असल्याचे यावेळी फोरमचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी सांगितले.

हेही वाचा - धक्कादायक : सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या; भावाचा आरोप, गुन्हा दाखल

हेही वाचा - वाघाची अशीही करामत, पाहा व्हिडिओ...

Last Updated : Nov 24, 2021, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.