काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी गोवा काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्रीमती कुमार इरेन बॅरोस यांच्या घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी इरेन बॅरोस यांच्या नातीने सादर केलेले गाणे देखील ऐकले.
Priyanka Gandhi Goa Elections : बेरोजगारीत गोव्याचा दुसरा क्रमांक -प्रियंका गांधी - South Goa Election Campaign
17:32 February 07
15:50 February 07
ही निवडणूक केवळ राजकीय पक्षांसाठी नाही तर गोव्याच्या भविष्यासाठी महत्त्वाची आहे. साधन समृद्धी, नैसर्गिक सुंदरता आणि व्यवसायांमध्ये हे राज्य श्रीमंत आहे. असे असतानाही बेरोजगारीत या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो.
नुवेम (दक्षिण गोवा)- कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. निवडणुकीची घोषणा झाली तेव्हापासून अनेक राजकीय नेते प्रचारासाठी गोव्यात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कॉंग्रेस नेते राहुल गांधी गोव्यात प्रचाराला आले आहेत. प्रियंका गांधी पहिल्यांदाच गोव्यात प्रचारासाठी आल्या आहेत. त्यांनी आल्याबरोबर भारतीय जनता पक्षावर कडाडून टिका केली आहे.
यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, की ही निवडणूक केवळ राजकीय पक्षांसाठी नाही तर गोव्याच्या भविष्यासाठी महत्त्वाची आहे. साधन समृद्धी, नैसर्गिक सुंदरता आणि व्यवसायांमध्ये हे राज्य श्रीमंत आहे. असे असतानाही बेरोजगारीत या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो.
दरम्यान, यासंदर्भात बोलताना भाजपचे गोवा प्रभावी सी. टी. रवी म्हणाले, की गोव्यातील महिला प्रियंका गांधी यांना विचारत आहेत, की उत्तर प्रदेशात ४० टक्के महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र गोव्यात केवळ १ टक्के महिलांना उमेदवारी का? महिला केवळ उत्तर प्रदेशात नेतृत्त्व करु शकतात. गोव्यात करु शकत नाहीत का? हे दुहेरी राजकारण आहे.