ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस आजपासून गोवा दौऱ्यावर; काँग्रेस, आप नेतेही लागले निवडणूक तयारीला - AAP Arvind Kejriwal

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते (भाजप) देवेंद्र फडणवीस यांची पक्षाने नुकतीच गोवा प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. फडणवीस आजपासून (सोमवार) दोन दिवस राज्याचा दौऱ्यावर येत आहेत. तसेच काँग्रेसचे निवडणूक प्रभारी व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम रविवारीच गोव्यात दाखल झाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप' नेते अरविंद केजरीवाल मंगळवारपासून राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे गणेश विसर्जनानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापणार असून खऱ्या अर्थाने निवडणुकीची हवा तयार करण्यात सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

BJP in-charge Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस आणि डॉ. प्रमोद सावंत
author img

By

Published : Sep 20, 2021, 7:26 AM IST

पणजी - गोवा विधानसभा निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्र गोमंतक पक्षासह सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राज्याच्या राजकारणातील नवखी आम आदमी पार्टी (आप) या सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गोव्याकडे मोर्चा वळवला आहे. या सर्वच पक्षांचे राज्याचे प्रभारी आणि राष्ट्रीय नेते हे आगामी निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गणपती विसर्जनानंतर गोव्यातील राजकीय वातावरण या नेत्यांच्या दौऱ्याने तापणार असून खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग भरताना दिसत आहेत.

BJP in-charge Devendra Fadnavis to visit Goa from today
देवेंद्र फडणवीस

पी. चिदंबरम, देवेंद्र फडणवीस, केजरीवाल राज्याच्या दौऱ्यावर

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते (भाजप) देवेंद्र फडणवीस यांची पक्षाने नुकतीच गोवा प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. फडणवीस आजपासून (सोमवार) दोन दिवस राज्याचा दौऱ्यावर येत आहेत. तसेच काँग्रेसचे निवडणूक प्रभारी व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम रविवारीच गोव्यात दाखल झाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप' नेते अरविंद केजरीवाल मंगळवारी राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे गणेश विसर्जनानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापणार असून खऱ्या अर्थाने निवडणुकीची हवा तयार करण्यात सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

फडणवीस सांभाळणार भाजपची धुरा

महाराष्ट्रातील २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळवून देणारे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे निवडणूक प्रभारी म्हणून भाजपने जबाबदारी सोपविली आहे. महाराष्ट्रप्रमाणे गोव्यातही फडणवीस भाजपला सर्वाधिक जागा जिंकून देण्यासाठी मनसुबे आखतील असा विश्वास मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. नुकतीच त्यांनी फडणवीस यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री किशन रेड्डी, दर्शन जर्दोश आणि गोव्याचे प्रभारी सी टी रवी हे राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री ,आमदार, विविध प्रभाग समिती व पदाधिकारी यांच्याशी निवडणुकीविषयी चर्चा व मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा : सिद्धी नाईकच्या मृत्यूमागे मोठ्या व्यक्तीचा हात; चर्चिल आलेमाव यांचा दावा

चिदंबरम, केजरीवालही राज्याच्या दौऱ्यावर

काँग्रेसचे निवडणूक प्रभारी रविवारपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत. कालपासून त्यांनी राज्यातील विविध मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. आपचे राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल हे मंगळवारपासून राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत, केजरीवाल यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसरी गोवा भेट असून यापूर्वी त्यांनी जुलै महिन्यात राज्याचा दौरा केला होता. तेव्हापासून आम आदमी पार्टी राज्यात आक्रमक धोरण व भूमिका घेऊन निवणुकीच्या तयारीला लागली आहे.

हेही वाचा : Goa Election : निवडणुका ठरलेल्या वेळेतच - मुख्यमंत्री

युतीकडे सर्वांचे लक्ष

चिदंबरम, केजरीवाल, फडणवीस यासारखे मातब्बर नेते राज्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे आगामी काळात कोणते पक्ष कोणासोबत युती करणार याकडे सर्वच राजकारण्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा : JeeneDoCampaign: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य महिलांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे - डॉ. निलम गोऱ्हे

प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षाच्या निर्णयावर अवलंबून

राज्यातील गोवा फॉरवर्ड व महाराष्ट्र गोमंतक पक्ष अद्यापही भाजप, काँग्रेस , राष्ट्रवादी व आम आदमी पार्टीच्या युतीबाबत होणाऱ्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहे. प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांशी युती करण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे, मात्र काँग्रेसच्या निर्णयावर पुढील भूमिका स्पष्ट होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.