ETV Bharat / state

MLA Nitesh Rane - आमदार नितेश राणेंकडून अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज - अटकपूर्व जामीन नितेश राणे

आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

MLA Nitesh Rane bail district court
अटकपूर्व जामीन नितेश राणे
author img

By

Published : Dec 27, 2021, 6:42 PM IST

Updated : Dec 27, 2021, 6:56 PM IST

सिंधुदुर्ग - आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यात अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा उच्च न्यायालयात अॅड. राजेंद्र रावराणे यांच्या माध्यमातून धाव घेतली आहे. या अटकपूर्व जामिनावर पहिली सुनावणी 27 डिसेंबर रोजी होणार होती. याबाबत उद्या 28 डिसेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती अॅड. रावराणे यांनी दिली आहे.

हेही वाचा - Narayan Rane on Nitesh Ranes arrest : नितेश राणेंना अटक होणार? नारायण राणेंनीच दिले संकेत

आयपीसी 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात आमदार नितेश राणे यांना अटकपूर्व जमीन जिल्हा न्यायालयात मंजूर होणार की, त्यासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार, हे चित्र उद्या 28 डिसेंम्बर रोजी स्पष्ट होणार आहे.

करंजेचे माजी सरपंच तथा शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता कारवाईसाठीचे वातावरण तापू लागले आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या सहित वरिष्ठ अधिकारी कणकवलीत दाखल झाले होते. दरम्यान आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, तपास सुरू असल्याचे सांगत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

वरिष्ठ पोलीस अधिकारी कणकवलीत दाखल

माहिती देताना पोलीस अधिकारी

सोमवारी सकाळीच संजीवकुमार सिंघल, संजय मोहिते यांच्यासहित सर्व वरिष्ठ अधिकारी कणकवलीत दाखल झाले होते. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह इतर अधिकाऱ्यांशी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सुमारे पाच तास चर्चा केली. त्यानंतर दुपारी ते कुडाळकडे रवाना झाले. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांना विचारले असता वरिष्ठ अधिकारी इन्स्पेक्शनसाठी आले होते, असे सांगत संतोष परब हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चालू आहे, असे सांगून अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

कणकवलीत पोलीस बंदोबस्तात वाढ

दुसरीकडे सिंधुदुर्गमधील अधिकारी, पोलिसांसहित दंगा काबू पथक तसेच, रत्नागिरी व रायगड येथूनही वरिष्ठ अधिकारी, डीवायएसपी, इतर अधिकारी, दंगा काबू पथक व पोलिसांचे पथक कणकवलीत दाखल झालेले आहे. कणकवलीतील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली असल्यामुळे नेमकी पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा - MLA Nitesh Rane Alleges on Government : संतोष परब हल्ला प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न - आमदार राणे

Last Updated : Dec 27, 2021, 6:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.