ETV Bharat / state

मत्स्यव्यवसाय विभागातील 'दोन मोठे मासे' अडकले लाचलुचपतच्या जाळ्यात

गस्तीवर असताना सापडलेल्या नौकेला सोडण्यासाठी २ लाखांची लाच स्वीकारताना सहाय्यक आयुक्त आणि परवाना अधिकारी या दोघांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

sindhudurg
मत्स्य विभागातील दोन अधिकारी अटकेत
author img

By

Published : Jan 5, 2020, 11:41 AM IST

सिंधुदुर्ग - मालवण येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयातील सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त आणि परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दोघांना लाचलुचपत विभागाने २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. यातील सहाय्यक मस्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांच्या कारभाराबाबत व्यवसायिकांमध्ये नाराजी होती. या नाराजीतूनच २ वर्षांपूर्वी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाला 'बांगडा फेक आंदोलना'चे वळण लागले होते. तर, या कारवाईमुळे मस्यव्यवसाय विभागातील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

मत्स्य विभागातील दोन अधिकारी अटकेत

शुक्रवारी रात्री मत्स्यव्यवसाय खात्याच्या गस्ती नौकेवर कर्तव्यावर असलेल्या सहाय्यक आयुक्त प्रदीप वस्त आणि परवाना अधिकारी शिवराज चव्हाण यांनी मासेमारी करताना मिळून आलेल्या पर्ससीन नौकेला पकडले. नंतर नौकेला सोडण्याकरता त्यांनी नौकामालकाकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास नौका जप्त करण्याची धमकी देत पैसे शनिवारी कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले होते.

हेही वाचा - महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी मनसेचे घंटानाद आंदोलन

यामुळे संतप्त नौका मालकाने या प्रकाराची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला आणि ही रक्कम स्वीकारताना दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. डी वाय एस पी दीपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, जनार्दन रेवंडकर, रवी पालकर, अजित खंडे, प्रथमेश पोतनीस यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा - सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी समिधा नाईक; उपाध्यक्षपदी राजेंद्र म्हापसेकर

Intro:अँकर /- मालवण येथील मस्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयातील सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त व परवाना अधिकारी शिवराज चव्हाण या दो घाना लाचलुचपत विभागाने 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली .यातील सहाय्यक मस्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांच्या कारभाराबाबत व्यवसायिकांमध्ये नाराजी होती व या नाराजी तूनच दोन वर्षा पूर्वी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलना ला बांगडा फेक आंदोलनाचे वळण लागले होते .आजच्या कारवाईने मस्यव्यवसाय विभागातील भ्रष्ट कारभार समोर आला आहे .
Body:V/O-दरम्यान शुक्रवारी रात्री मस्यव्यवसाय खात्याच्या गस्ती नौकेवर ड्युटीवर असलेल्या सहाय्यक आयुक्त प्रदीप वस्त व परवाना अधिकारी शिवराज चव्हाण यांनी मासेमारी करताना मिळून आलेल्या पर्ससीन नौकेला पकडले .व या नौकामालकाकडे सोडण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली . व पैसे न दिल्यास नौका जप्त करण्याची धमकी दिली होती व पैसे शनिवारी कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले होते .या प्रकाराने संतप्त नौका मालकाने या प्रकाराची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली त्यानुसार सापळा रचण्यात आला .व रक्कम स्वीकारताना दोघांनाही ताब्यात घेण्यात आले .डी वाय एस पी दीपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार,जनार्दन रेवंडकर,रवी पालकर,अजित खंडे, प्रथमेश पोतनीस यांच्या पथकाने ही कारवाई केली .Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.