ETV Bharat / state

सातारा विशेष : पुष्प पठाराबरोबरच आता कास दर्शन झालं सुलभ; बुधवारपासून बस फेरी होणार सुरू - bus service start kas plateau

कास पठार कार्यकारी समितीकडे आगाऊ नोंदणी केल्यास कास दर्शन सेवेचा लाभ मिळणार आहे. समितीचे नूतन अध्यक्ष मारुती चिकणी व उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत यांनी 'ईटीव्ही भारत'ला एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत या नवीन उपक्रमाची माहिती दिली.

kas pathar
कास दर्शन
author img

By

Published : Aug 30, 2021, 12:30 PM IST

Updated : Aug 30, 2021, 1:47 PM IST

सातारा - रानफुलांचा आनंद घेण्यासाठी कासला येणाऱ्या पर्यटकांना आता परिसरातील भांबवली धबधबा, देवराई, शिवसागर बॅकवॉटर, तापोळा- महाबळेश्वर दर्शन, पवन ऊर्जा प्रकल्प, कास तलाव आदी 12 निसर्ग पर्यटन स्थळांचे गाईडसह दर्शन घेता येणार आहे. कास दर्शन नावाने ही सशुल्क सेवा एक सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने संबंधितांशी साधलेला संवाद
रंगोत्सव हा दुर्गोत्सवानंतरच -

कास पठार कार्यकारी समितीकडे आगाऊ नोंदणी केल्यास कास दर्शन सेवेचा लाभ मिळणार आहे. समितीचे नूतन अध्यक्ष मारुती चिकणी व उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत यांनी 'ईटीव्ही भारत'ला एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत या नवीन उपक्रमाची माहिती दिली. 25 ऑगस्टला पठारावर पर्यटन शुल्क आकारणी सुरू झाली असली तरी खरा फुलांचा रंगोत्सव हा दुर्गोत्सवा नंतरच पाहायला मिळणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

ऑनलाईन बुकींगला प्राधान्य -

एक सप्टेंबरला कास पठारासाठी वेबसाईटवर ऑनलाईन बुकींग सुरू होईल. त्या अंतर्गतच कास दर्शनासाठी बुकिंगचा पर्याय उपलब्ध केला आहे. कास पठारावर फिरून झाल्यानंतर परिसरातील निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर त्यांनी परिसर दर्शन सहलीचा पर्याय निवडून ऑनलाईन बुकींग करावं, असे आवाहन कास पठार कार्यकारी समितीचे नूतन अध्यक्ष मारुती चिकणे यांनी केले.

हेही वाचा - Tokyo Paralympics : टोकियोत भारताने जिंकले तिसरे पदक, विनोद कुमारची कास्य पदकाला गवसणी

चार तासांची असेल फेरी -

या समितीचे माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव म्हणाले, "कास परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. पर्यटकांना त्याची माहिती व्हावी यासाठी कास दर्शन या चार तासांच्या फेरीचे नियोजन समितीने केले आहे. पार्किंगपासून ही फेरी सुरू होईल. सज्जनगड आणि उरमोडी दर्शन, घाटाई देवराई, कास तलाव, भांबवली धबधबा, अंधारी येथून वासोटा व कोयना जलाशयाचे दर्शन, सह्याद्री नगरचा पवन ऊर्जा प्रकल्प, वेण्णा व्ह्यू, एकीव धबधबा, कण्हेर धरण आणि तेथून परत पार्किंग असा या फेरीचा मार्ग असेल. या फेरीमध्ये दोन चहा व पाण्याची बाटली प्रत्येक पर्यटकाला देण्यात येईल."

गार्डची असणार सुविधा -

कासपठार जागतिक वारसा स्थळ आहे. त्याच्या परिसरात निसर्गाची मुक्तहस्ते उधळण आहे. या परिसराचे माहितीसह दर्शन घडावं, अशी पर्यटकांची मागणी होती. त्याला उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी मूर्त स्वरूप दिले प्रत्येक गटाबरोबर एक गाईड असेल त्या स्थळांची माहिती हा गाईड पर्यटकांना देईल, असे समितीचे सदस्य गोविंद बादापुरे (रा.कासाणी) यांनी स्पष्ट केले. 'शनिवार-रविवार गर्दी करण्यापेक्षा सोमवार ते शुक्रवार पठाराला भेट देऊन पर्यटकांनी कासच्या निसर्गाचा आनंद घ्यावा,' असे आवाहनही कासचे निवृत्त वनपाल श्रीरंग शिंदे यांनी केले.

Last Updated : Aug 30, 2021, 1:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.