ETV Bharat / state

दमदार पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद सरासरी 12 हजार 337 क्युसेक पाण्याची आवक

author img

By

Published : Jul 6, 2020, 7:06 AM IST

पावसाचा जोर वाढल्याने सध्या धरणात प्रतिसेकंद सरासरी 12 हजार 337 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्याचवेळी पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीजनिर्मिती करुन पूर्वेकडे सिंचनासाठी प्रतिसेकंद 2 हजार 111 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

Koyna dam
कोयना धरण

सातारा- कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार सुरुवात केली आहे. यामुळे कोयना, नवजा, महाबळेश्वर आदी परिसरातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही वाढतच चालले आहे. सध्या येथे प्रतिसेकंद सरासरी 12 हजार 337 क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातील पाणीसाठ्यातही अपेक्षीत वाढ होत आहे. धरणात सध्या एकूण उपलब्ध पाणीसाठा 33.69 टीएमसी झाला आहे.

शनिवारी पहाटेपासूनच पाटण तालुक्यात पावसाने सुरूवात केली.रविवारी पहाटे पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही वाढले आहे. सध्या धरणात प्रतिसेकंद सरासरी 12 हजार 337 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्याचवेळी पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीजनिर्मिती करुन पूर्वेकडे सिंचनासाठी प्रतिसेकंद 2 हजार 111 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणातंर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही वाढल्याने धरणातील पाणीसाठा व पाणीपातळीत अपेक्षित वाढ होत आहे.

सध्या धरणातील एकूण उपलब्ध पाणीसाठा 33.69 टीएमसीपैकी उपयुक्त साठा 28.69 टीएमसी, पाणीउंची 2083.3 फूट, जलपातळी 634.79 मीटर इतकी झाली आहे. गेल्या चोवीस तासांतील व एक जूनपासून आजपर्यंतचा एकूण पाऊस पुढीलप्रमाणे कोयना 113 मिलीमीटर (973), नवजा 116 मिलीमीटर (1063) व महाबळेश्वर येथे 144 मिलीमीटर (979) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तालुक्यातील दुर्गम ठिकाणी वसलेल्या आणि सर्वात जास्त पावसाची नोंद होणाऱ्या पाथरपुंज येथे 35 (1521) मिलीमीटर पाऊस पडला आहे. तसेच कोयना पाणलोट क्षेत्रातील अतिपर्जन्यवृष्टी होत असलेल्या पर्जन्यमापन केंद्रातील प्रतापगड येथे 28 मिली मीटर (865), सोनाट 35 (827), वळवण 13 (1389), बामणोली 16 (725) मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. दरम्यान पाटण तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी सध्या दमदार व अपेक्षित पाऊस पडत असल्याने शेतकरी आपल्या शेती कामाला लागला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.