ETV Bharat / state

गेल्या 5 वर्षात कराड दक्षिणची घडी विस्कटली; विलासकाका उंडाळकरांचा घणाघात - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

उंडाळकरांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या रयत संघटनेने उंडाळकर पुत्र जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांना कराड दक्षिणच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरविले आहे. त्यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत विलासकाका उंडाळकर बोलत होते.

विलासकाका उंडाळकर
author img

By

Published : Oct 3, 2019, 7:48 PM IST

कराड - देशाची अखंडता टिकावी याकरिता गांधी व नेहरुंच्या घराण्याचा त्याग विसरता येणार नाही. त्यांच्यामुळे सामान्य माणूस सत्तेत आला. तो निर्भय बनला. मात्र, खोटा इतिहास रंगवून देशाची संस्कृती बिघडविण्याचे काम काही विघ्नसंतोषी मंडळी करू पाहत आहेत. गांधी, नेहरु, आंबेडकरांच्या विचारसरणीने मी कराड दक्षिण मतदार संघातील जनतेला आत्मसन्मान दिला. आपण या मतदार संघात बांधलेली विकासाची घडी उद्धवस्त करण्याचे काम विरोधकांनी केल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांनी केली.

उंडाळकरांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या रयत संघटनेने उंडाळकर पुत्र जिल्हा परिषद सदसय अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांना कराड दक्षिणच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरविले आहे. त्यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत विलासकाका उंडाळकर बोलत होते.

हेही वाचा - शिवसेना-भाजपच्या चुकीच्या जागा वाटपामुळे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणे अशक्य - अमोल कोल्हे

कराड दक्षिणमध्ये 1980 ला आपण आमदार झाल्यापासून विकासाला प्रारंभ झाला. प्रत्येक गावामध्ये रचनात्मक विकासकामे आपण केली. विकासाचा आणि सर्वसामान्यांना आत्मसन्मान देण्याचा विचार घेवून रयत संघटनेच्या माध्यमातून माझे व माझ्या सहकार्‍यांचे काम अव्याहतपणे सुरू आहे. कृष्णाकाठच्या लोकांनी कोणतेही दडपण न ठेवता निर्भय रहावे. स्वत:चा नैतिक अधिकार विसरू नका. आजकालच्या नेत्यांना सत्तेच्या नादात झेंडा एका पक्षाचा आणि काठी दुसर्‍याची, हे सुध्दा माहिती पडत नाही, असे उंडाळकर म्हणाले.

कंपन्या बंद पडून लोकांचा रोजगार गेला. दलित, मुस्लीम व बहुजन समाज अस्थिर झाला आहे. परंतु, सर्जिकल स्ट्राईकचा आणि धार्मिक भावनेवर माथी भडकवली जात आहेत. त्यामुळे समाजात निर्माण झालेली ही विषमता दूर करण्यासाठी रयत संघटनेच्या माध्यमातून आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठवा. आमचा कोणत्याही व्यक्तीला विरोध नसून विरोध विचारांना असल्याचे उंडाळकर यांनी सांगितले.

हेही वाचा - डॉ. अतुल भोसलेंचे कराडात जोरदार शक्तीप्रदर्शन, पृथ्वीराज चव्हाणांचाही अर्ज दाखल

कराड दक्षिण मतदारसंघातून सलग 7 वेळा निवडून येऊन 35 वर्षे कराड दक्षिणचे प्रतिनिधित्व केलेल्या विलासकाका उंडाळकरांना उमेदवारी डावलून पृथ्वीराज चव्हाण यांना दिली होती. मात्र, उंडाळकरांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी चव्हाण, उंडाळकर आणि अतुल भोसले, अशी तिरंगी लढत झाली होती. यंदाही तिरंगी लढत होत असून विलासकाकांच्या जागी त्यांचे पुत्र रिंगणात आहेत.

Intro:कराड : देशाची अखंडता टिकावी याकरिता गांधी व नेहरुंच्या घराण्याचा त्याग विसरता येणार नाही. त्यांच्यामुळे सामान्य माणूस सत्तेत आला. तो निर्भय बनला. मात्र, खोटा इतिहास रंगवून देशाची संस्कृती बिघडविण्याचे काम काही विघ्नसंतोषी मंडळी करू पाहत आहेत. गांधी, नेहरु, आंबेडकरांच्या विचारसरणीने मी कराड दक्षिण मतदार संघातील जनतेला आत्मसन्मान दिला. रचनात्मक विकासाची बांधणीदेखील केली. तथापि, आपण या मतदार संघात बांधलेली विकासाची घडी उद्धवस्त करण्याचे काम विरोधकांनी केल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांनी केली. 
Body:उंडाळकरांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणार्‍या रयत संघटनेने उंडाळकर पूत्र जिल्हा परिषद सदसय अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांना कराड दक्षिणमच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरविले आहे. त्यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत विलासकाका उंडाळकरांनी ही टीका केली. 
कराड दक्षिणमध्ये 1980 ला आपण आमदार झाल्यापासून विकासाला प्रारंभ झाला. प्रत्येक गावामध्ये रचनात्मक विकासकामे आपण केली. विकासाचा आणि सर्वसामान्यांना आत्मन्मान देण्याचा विचार घेवून रयत संघटनेच्या माध्यमातून माझे व माझ्या सहकार्‍यांचे काम अव्याहतपणे सुरू आहे. कृष्णाकाठच्या लोकांनी कोणतेही दडपण न ठेवता निर्भय रहावे. स्वत:चा नैतिक अधिकार विसरू नका. आजकालच्या नेत्यांना सत्तेच्या नादात झेंडा एका पक्षाचा आणि काठी दुसर्‍याची, हे सुध्दा माहिती पडत नाही. कंपन्या बंद पडून लोकांचा रोजगार गेला. दलित, मुस्लीम व बहुजन समाज अस्थिर झाला आहे. परंतु, सर्जिकल स्ट्राईकचा आणि धार्मिक भावनेवर माथी भडकवली जात आहेत. यामुळे समाजात निर्माण झालेली ही विषमता दूर करण्यासाठी रयत संघटनेच्या माध्यमातून आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठवा. आमचा कोणत्याही व्यक्तीला विरोध नसून, विरोध विचारांना आहे. 
कराड दक्षिण मतदार संघातून सलग सातवेळा निवडून येऊन 35 वर्षे कराड दक्षिणचे प्रतिनिधीत्व केलेल्या विलासकाका उंडाळकरांना उमेदवारी डावलून पृथ्वीराज चव्हाण यांना दिली होती. मात्र, उंडाळकरांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी चव्हाण, उंडाळकर आणि अतुल भोसले, अशी तिरंगी लढत झाली होती. यंदाही तिरंगी लढत होत असून विलासकाकांच्या जागी त्यांचे पुत्र रिंगणात आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.